मुख्य सामग्रीवर वगळा

एका भाषेचा मृत्यू....


एक भाषा संपणे म्हणजे या जगातून एका मुळ संस्कृतीचा नामशेष होणे होय.हे खरच खूप वाईट आणखी यावर अभ्यास,विचार करण्यासारखे आहे.....


काही दिवसांपूर्वी एका भाषेचा मृत्यू झाला म्हणजेच तीचं अस्तित्व या जगातून समुळ नष्ट झाले,या विषयवार एक लेख लिहला होता परंतु त्या लिखाणातून मला मनाला संतुष्टी वाटले नाही म्हणुन आज पुन्हा हा एक लेख....

कारण एक भाषा संपणे म्हणजे जगाच्या पाठीवर झालेली ही एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती या जगात वापरल्या जातात....

म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे...काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये,कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये....

एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फक्त त्या भाषेतच उपलब्ध होत्या,त्या देण्यापासून कायमचे वंचित गमावतो....

पुन्हा एकदा जर तेवीसशे भाषांचा विचार केला जे खूप मोठे शब्द भांडार आहे,त्याचा विचार हा तंत्रज्ञानाच्या या युगाच्याही खूप पुढे आहे...विविध देशात तर ती भाषा संपुष्टात येणार आहे म्हणुन ती फायद्याची नाही,म्हणून तिच्यावरचं होणारा अभ्यास ही थांबवला आहे....

हे किती वाईट अन् भयावह आहे,कारण एक भाषा संपणार म्हणजे त्या भाषेत केलेले संस्कृतीचे निसर्गाचे,मानवी जीवन,जतन त्यावर केलेलं,भारत
हे संपून जाईल....

एक आदिवासी बाई होती गरीब
अमेरिकेच्या अलास्का प्रदेशात राहायची
नव्वदीची...

तिचं नाव मेरी स्मिथ जॉन्स
तिला तर काहीच माहीत नव्हतं,
तिला येत नव्हती जादू
तिला ठाऊक नव्हती हातचलाखी...

तिला भेटला नाही कोणताच पुरस्कार
तिला ओळखायचे नाहीत
तिच्या देशातील लोकसुद्धा
ती मरुन गेली...

दोन हजार दहाच्या एकवीस जानेवारीला,
खरं तर यात काहीच विशेष नाही
या वयात मरुन जातात बहुतेक लोक...

पण सांगतो तुम्हाला,
ती मेली आणि तिची खबर,
दुरातून उडत पोहोचली माझ्यापर्यंत...

रेडिओवरुन, टीव्हीमधून,पेपरच्या पानांमधून
भाषा विज्ञानाच्या चर्चेत गाजत राहिलं तिचं नाव
नव्वदीची ती गरीब म्हातारी
शेवटची व्यक्ती होती,जिला माहीत होती
‘ईयाक’ नावाची भाषा...

"म्हातारी मेली आणि मरुन गेली एक भाषा
या जमिनीवरुन,अनंतकाळासाठी..."

कवी:यादुमनि बेसरा,(संथाली).
मराठी अनुवाद:पृथ्वीराज तौर.

जेव्हा एक भाषा इतक्या सहज संपुष्टात येते,तिच्यासोबत आपण खूप काही विसरून जातो कींवा ते आपल्याला विसरण्याला भाग पडते....

हजारो वर्षांच्या जगण्याचा सांस्कृतिक,भौगोलिक,मानवी उत्क्रांतीचा यावर त्या भाषेत झालेलं लिखाण नाहीये यांमुळे हे सर्व त्यांच रोजच्या जीवनात जगण्याची विशिष्ट पद्धत,दस्तावेज मरत असेल.या संबंधीचे शब्दांमध्ये दडलेले वेगवेगळे संकेतक मरत असेल....


पुढे जाऊन फक्त आपल्याच देशाचा विचार कधी केलाततर,आपला देश ओळखल्या जातो विविध भाषा,संस्कृती,वेशभूषा,जगण्याच्या वेग वेगळ्या पद्धती,राहणीमान,पाककला,सण,वार,शिक्षण यांमुळे....

आपल्या देशातही अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे,परंतु या भाषांवरही अजूनही कुठला अभ्यास,लिखित स्वरुपात केलेला अनुवाद,लेखन भेटत नाही ही शोकांतिका आहे...

भारत या देशाला सर्वदूर ओळख दिली जाते अन् मानाने सर्वदूर सर्वाधिक जुणी भाषा म्हणून आपण ज्या भाषेला मिरवतो ती "संस्कृत" भाषा कदाचित पुढील काही शतकात नामशेष होईल याची भीती वाटत आहे...कारण अलीकडेच्या काळात या भाषेबद्दल न झालेला अभ्यास....

नव्या पिढीला अजूनही बऱ्यापैकी ही भाषा शाळेत उपलब्ध नाही,अजूनही ती कोणाला येत नाही.ही भाषा संपली तर किती मोठा इतिहास,माहिती,संस्कृती,साहित्य हे कायमसाठी संपुष्टात येईल.या भाषेवर बऱ्यापैकी (अल्प प्रमाणात) लेखन झाले आहे परंतु,तिचे जतन,संवर्धन करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत असेही वाटून जाते....

हे फक्त या भाषेसाठी नाहीतर भारतात,जगात अश्या अनेक भाषांसाठी आहे...तेव्हा एक भाषा संपणे हे खूप वाईट गोष्ट आहे,हे नुकसान कधीही न भरून निघण्यास सारखे आहे...

एका भाषेचं असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये,इतकंच कारण एका भाषा,संस्कृतीला आपली पुढची पिढी कायमची मुकलेली असेल जे नको वाटते....

#एका_भाषेचा_मृत्यु...


Written by,

Bharat.L.Sonwane.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...