कधी कधी मी पण त्या शुन्यासारखाच होऊन जातो इतरांच्या आयुष्यात.
ज्याप्रमाणे शुन्याला कुठलेही महत्त्व नाहीये,तसेच मलाही नाहीये कुठलेच महत्त्व,त्यामुळे असे वाटते की एकांत व आयुष्यातील सरत जाणारा प्रत्येक एक एक क्षण माझ्या स्वतःसाठी मी जगावा....
कधीतरी अश्या ठीकाणी निघून जावे विचारांनी,हो फक्त विचारांनीच कारण काय होत,मी शरीराने गेलो की शब्दांचा कींवा त्या स्थळाचा न राहता आठवणींचा व कल्पनेतील त्या आठवण येणाऱ्या व्यक्तीचा होऊन जातो...
हल्ली हे मन अन् मी विचाराने भटकत असतो कधीतरी त्या खदानीच्या कपारीत,शोधत असतो कोरदार ती काळे दगडं जी माझीच आकृती त्या खदानीच्य सरळ सुट दगडावर कोरण्यासाठी कामं येतात....
अलीकडे त्या खदानीतील डबक्यात साचलेल्या पाण्यात राहणारे ते बेडूक माझ्यापेक्षा किती सुखी आहे,हे मला मी तिथे शरीराने बसलेलो असलो की टून-टुन पाण्यात उड्या मारत ते बेडूक दाखवत असतात.मला याचा खूप त्रास होतो म्हणजे हे सगळं कसं आहेना की,लोक बोलतात की मानव जन्म सुखाचा आहे पण इथं सारीच प्रश्न आहे ज्याला आपल्याला उत्तर शोधत राहायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत....
असेच कधीतरी माझे मन मला त्या घळघळ करणाऱ्या ग्लेशियर जवळ घेऊन जाते कधीतरी. मलाही वाटते की या ग्लेशियरमध्ये उतरून घ्यावं कायमच....
पांढरा शांतीचा रंग तो इथे चहुपार आहे,मग आत मध्येपण तेच असेल पण नकळत जेव्हा मनाला शरीराची आठवण येते ते डोळ्यातून टिपूस गाळायला लागतं....
जेव्हा-जेव्हा हे अश्रू त्या बर्फाळ जमिनीवर पडत राहतात,तेव्हा ते उडणारे शिंतोडे जमिनीवरून घरंगळत त्या ग्लेशियरवर वाहत जातात मग तेव्हा ते अश्रू न राहता ते ड्रिपस्टोन होऊन जातात....
तेच चक-चक चमकणारे ड्रिपस्टोन जेव्हा मी बघतो,तेव्हा तिथं माझं आयुष्य मला समजत जातं...
कारण तो ड्रिपस्टोन वर्षानुवर्ष एकटा माझ्या सारखाच निराशेच्या गर्तेत,त्या ग्लेशियर सोबत दुःखद आयुष्य जगत कडक धारदार होत राहतो, कणखर होत राहतो....
पण ते कोणासाठी ? कारण पाणी सुद्धा ड्रिपस्टोनच्या आसपास जाऊन त्याचे मार्ग बदलत राहते,पण...
या पुढेही जाऊन जर विचार केला तर,तो ड्रिपस्टोन माझ्या मनाचं दुखः व माझ्या मनातील एकांतपणा,जो त्याने वर्षानुवर्ष अनुभवलेला असतो तो त्या ड्रिपस्टोनला मला भेट द्यायचा नाहीये परतीच्या वाटेवर.....
त्यामुळे तो स्फटीक बनून माझ्या निराशेच्या गर्तेत हरवलेल्या मनाला वाट दाखवून जातो,या भयावह ग्लेशियर असलेल्या त्याच्या दु:खद आयुष्यात मला उजेड देऊन,पुन्हा एकदा माझ्या मनाला शरीरात आणून सोडवून जातो त्याच्या एकांतवासात...
कारण त्याला तो चुकत नाही,पण माझे हे हळवे मन आहेना जे सतत इतरांचा विचार करत असते. मग त्याचा का नाही करणार..?
तो ड्रिपस्टोन कसा जगतो याबद्दल मला त्याचे प्रेम वाटते,यातून त्याचीही माझ्यासारखी सुटका करावीशी वाटते.या भव्य अश्या ग्लेशियर मध्ये तो ड्रिपस्टोन त्याचे ते रोज थोडे-थोडे मरणारे हृदय
मी पाहत असतो....
थेंब-थेंब करीत ते स्वत:ला संपवत असते अलवारपणे,अन् एकदाचं ते ड्रिपस्टोन तुटून खाली पडते अन... त्या खोल घळईत कायमचं अदृश्य होते काळाच्या आड होऊन जाते,त्याच स्फटीकपण कायमचं इथंच सोडवुन....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा