उरल्या दोन घटकांच्या सुखाचा हिशेब आहे तो,
मी मांडत नाही हल्ली दोन सुखाच्या घटकांचा हिशोब तो..!
कधीतरी भर उन्हात पाय भाजून निघायचे पण,बकरीच्या पिलाला पाणी पाजण्याचा दोन आनंदी घटकांचा हिसेब आहे तो..!
कधीतरी अनवाणी चालणाऱ्या म्हातारीला वाट सरुस्तोवर दिलेल्या,वाहनांचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..!
कधीतरी भरल्या देवळात माझ्या रिकाम्या झोळीला घेऊन,देवासमोर भिक मांगतांनाचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..!
कधीतरी सांजवेळी देव्हाऱ्यात दिवा लावताना, वातीच्या जळण्याचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..!
रितेपणाच्या ओंजळीत कल्पनेतील पडणाय्रा गुलमोहरांच्या फुलांच्या,आनंदी क्षणांचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..!
कधीतरी आईच्या पायाशी वंदन करण्या झुकता, तेहतीस कोटी देव दिसतात,
तेव्हा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..!
अन् अन् शेवट आठवणीत बापाच्या आसवांच्या फुटलेल्या बांधास सावरतांनाचा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..!

नांव:भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
Email:bs7880544@gmail.com
मु.पो:कन्नड जि:औरंगाबाद.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा