#गाव_हरवलेली_माणसं...
घ्या आवराया म्हणतो मी आता
जगण्यासाठी इथे काही उरले नाही,
झालाच जीव पुन्हा जीवावर उधार इथे आता,
मयतावर जाळण्या लाकडेही इथे आता उरले नाही...!
ठरलो आहे मी खरा परप्रांतीय बरका आता,
कधीतरी सोवळे खोटेच माझी गायली जात होती,
माझ्या स्तुतीचे मला आता कळले होते ओझे,
चिपाड झालेल्या शरीराला आता इथे जागा नाही..!
मी खोटे सोवळे कधी गात नाही माझे,
मला माहितीच होते माणुसकी हरवलेल्या माणसात मी जन्मलो आहे,
अन् बेवारशी आमच्या या तांड्यास किती ती किंमत आहे..!
परप्रांतातून आपल्याच गडीला आणाया तुकोबाचे आधुनिक विमान आहे,आमच्यासाठी मात्र काळाने केलेला घात सहत फटके खात चालणारी ज्ञानीयाची भिंत आहे..!
भंगली आमची दुनियाच सारी आता अन् सरला आहे संसार सारा,
तसाही संसार काय आमचा दोन गाठुडे अन् एक अनवाणी लेकरू,
घेऊन फिरतोय पाठीला बाकी सगळा तुमचाच आहे पसारा..!
फासावर लटकण्या ही काय मुजोरी आमची,
उघडा संसार घेऊन फिरण्या हल्ली सवयच झाली आहे,
फासावर लटकण्या पेक्षा ही माझी बेवारशी दुनियाच आता मला सोपी झाली आहे..!
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा