तब्बल चार वर्षांपूर्वी पाठवलेला मॅसेज काही दिवसांपूर्वी seen झालेला होता,मॅसेज पाठवणं व मेसेज बघणं यातला वेळ बघितला तर खरच सांगु अलीकडे खूप गोष्टी बदलल्या आहे....
तेव्हा फक्त मर्यादित विचार होते,अलीकडच्या काळात त्यांना भविष्यातील स्वप्नांचे डोहाळे लागले आहे....माझं अन् भविष्य...काय भविष्य आहे ?
सारा अंधारच तर दिसतो भिंतीवर तुझ्या.तू ना...हो मीच हरवला आहे चिंतेच्या काळोखात तुझ्या मनात मोजकेच विचार आहे फक्त....
करियर,लेखन,वाचन,कधीतरी मुड बदलेला असला की मग ती आठवते तुला,ऐकल होतं मन बोलतं ते खरे असते....
होनं तर ऐक मग,मी खरच बोलतो आहे या पलिकडे नाहीये ओळख तुला जगाची....
ती नाही आवरत तुला,मी तिला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्या तिने पाळल्या आहे.
यशाची उत्कर्षाची,शिखरे ती सर करत आहे,तुला कसला इतका आव तिने तुझा मॅसेज बघावा,इतकं होऊनही तिने तुझी विचारपूस करावी,तुझा Attitude इथेही आड यावा इतकेच सांगेल,सावर स्वत:ला मी मन आहे तुझं फक्त....
अरे हो खरे आहे,पण माणूस कसा असतो नाही का मॅसेज seen होऊनही बोलत नाही.
एकतर असे आहे की,सध्या मी विचारांमध्ये दिवसाची रात्र करतो,रात्रीचा दिवस करतो....
हो असंच जे तू ऐकलंय तेच ....
रात्र रात्र जेव्हा मोबाईल स्क्रीन फक्त स्क्रोल होत असते,माझ्यासारखे आयुष्यातून उजाड हरवलेले बरेच व्यक्त होतात इथं त्यांना वाचत बसतो,अंधारात मार्ग शोधत चाचपडत चालणारे सुद्धा इथे खूप आहे त्यांनाही भेटत असतो.कधीतरी तुझा seen झालेला मॅसेज बघून घेत,पुन्हा तुझी भिंत स्क्रोल करत असतो....
अलीकडे काल परवा डोक्यात येऊन गेलं होत की,ती स्लीपर नसते का दोन बेल्टची निळ्या कलरची ती घालून,मोकळी प्यांड घालून शहरात पायी चक्कर मारून यायचाय मध्यरात्री...
सोबतीला दोन-तीन पेपर पण ठेवायचे आहे, कालपरवा ज्या उड्डाणपुलावरून भविष्याचा वेध घेणारी स्वप्न बघत होतो,त्याला खोक पडली आहे. तीपण बघून घेऊ पुला खालून जाऊन,रात्री त्या रस्त्याला खेटून असलेल्या कोर्ट समोरील बाकावर पेपर अंथरूण झोपून घ्यायचं मनात येऊन गेलं आहे ते ही मी करणार आहेच...
मध्यरात्रीच्या शहरात फिरतांना जे सूनपन मनावर स्वार होते ना तेच खरे सुख आहे,मग मलाच कधीतरी त्या ज्युलियस सीझर,अथ्थेलोच्या स्वतंत्रपणाच्या गोष्टी पटून येतात....
स्ट्रीट लाईटच्या खाली खायला शोधणार ते कुत्रे इथेच का शोधत असेल ? दूरवर कोणीतरी जागते रहो...! ची घोषाबाजीही करत आहे.
पण जगायला आम्ही झोपलोच कुठे आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा