आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीवर प्रेम होते,ते व्यक्त करायची वेळ येतेना करून टाकावं ते व्यक्त....
आता हे काय नवीन तुझं.... तुझे काहीतरी वेगळंच चालू असत तिनं संवाद चालू असतांना मला हाताने खुणावले....
पण हो आयुष्यभर एखाद्या व्यक्तीशी अव्यक्त नाते निभावत राहणे हवे तितके सोपे नसते,मग असं शेवटच्या क्षणाला व्यक्त होऊन जायचं...
दोघांपैकी कोणीतरी एक काहीतरी या सुखात तरी सोडून जाईल की,आपल्यावरही कुणीतरी होते जे आपला विचार आपल्यापेक्षा जास्तच करायचं....
तू वेडा आहेस का रे ? शब्दांच्या दुनियेत काय चार शब्दांची ओळख झाली म्हणून काही वेड्यागत बोलत असतोस...वेळ काय...?
बोलतो काय...?
अन् हो हे शब्दचांदणे बोलण्यासाठीच छान वाटतात डिअर.... निभावणे खूप कठीण असते हेअव्यक्त राहुण हे नाते जपणे...
असं काही नाहीये हा मी नाही का निभावत आहे.... म्हणजे मला समजले नाही.... काही नाही अन् तू समजुन पण घेऊ नकोस,
कारण मी फक्त शब्द चांदण्यामध्ये विहार करत असतो,खुल्या आकाशात मुक्त विहार करायला. मला नाही जमत सोबत व्यावहारिक गणितं अन् त्यामध्ये जगायला ही नाही जमत.
माझं आयुष्य सोहळा आहे हे खरे आहे,पण त्याला पांथस्थ म्हणून जगायचं मी नेहमीसाठी ठरवलं आहे....
काहीतरी जगायचं वेगळं म्हणुन हे अव्यक्तपण घेऊन मिरवत असतो मी स्वताला आनंदी भासत या जगात,खोट्या चेहऱ्याची साथ असते नेहमीच यात....
पण त्या खोट्या चेहर्यामागची अस्वस्थता अन् न उमगलेले अनुत्तरित प्रश्न तुला माहीत आहे,त्याची उत्तरेही तू देत असतेस....
तसं काही नाही रे पण तू हे शब्दात हरतो अन् शब्दांचा होऊन जातोस ते मला भावतं,मग नकळत मी लट्टू होत जाते तुझ्यावर...
पण हे बाकी काही अर्थात प्रेम अन्....
बस्स स्टॉप please.... यापुढे एकही शब्द नकोय मला तुझा,इथवरच बोलायचं तू फक्त कारण पुढे बोलणे खूप काही महत्त्वाचे आहे.कधीतरी तो टर्निंग पॉईंट असेल,नाहीतर शेवट असेल आयुष्याचा....
म्हणून या क्षणांना आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतांना,शिफा भरवत असतांना थिजलेल्या डोळ्यात सांगायचे आहे.कींवा थिजलेल्या डोळ्यांना सोबत घेऊन सांगायचे आहे....पण सांगायचे आहे.....
हा विषय थांबवणार अशील तर बोल...
इथे भावनांच्या गुंत्यात माझा तोल गेला तर तुला सावरायला नाही जमायचं सांगते आहे हं....कारण तुझं ते अव्यक्त आहे.पण मला नाही जमत फार काळ अव्यक्त रहायला....
जी हुकुम सुनों भी अभीं.... "हमने सूना था कोई तो हैं इंन्सान,जो कब्र पे जाकर "प्यार" का इजहार कर बैठे.... हम तो सिर्फ आपको मृत़शया पर बता देंगे जो जिंन्दगी में पहले जायेंगा...."
#अव्यक्त_दोघंही_क्षणांचा_शेवट...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा