अस्वस्थ मनाचे गुज...!
अस्वस्थ मनाला घेऊन मी जगायचो,
ओंजळीत सुखाचे सुटे दोन क्षण घेऊन त्यातच मी रमायचो...!
त्या दोन क्षणांच्या जगण्यात रमने न जमले मला,धुसर झालेल्या जीवनात मी माझं आयुष्य शोधायचो...!
बंदीस्त झालेल्या भावनांना मुक्त करण्यासाठीचा प्रवास माझा,अव्यक्त विचारांना व्यक्त करण्यासाठी मी भटकायचो...!
प्रवास माझ्या सोबतीने हरवलेल्या सुखाचा,
दुःखात मात्र मी हल्ली खोटे सुख अनुभवत जगायचो...!
डोळ्यात दिसे झळ पांघरलेल्या निराशेची, उसने आवसान आणत मात्र मी जगण्याच्या स्पर्धेत कीत्येकदा हरायचो...!
तिमिरातुनी तेजाकडे रोजचा प्रवास माझा,जगण्यासाठी रोज थोडा थोडा मात्र मी मरायचो...!
अस्वस्थ मनाला घेऊन मी जगायचो,
ओंजळीत सुखाचे सुटे दोन क्षण घेऊन त्यातच मी रमायचो...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा