दोन ओळी मी लिहून पुन्हा खोडल्या
आहे,
बाकी तू समजून घे काय ते लिहले आहे..!
बंद खिडकीच्या पल्ल्याड छटा तुझी मी मलाच सावरत आहे,
इश्यारे खुले पापण्यांचे तू या नयनांना आता करू नकोस..!
ऐकनं मी एकदाचा पडदाच आता खिडकीचा ओढत आहे,
तू मात्र सावरतांना बट तुझी आता ओढणी मात्र झुकवु नकोस..!
बंद खिडकीच्या आत अस्वस्थ मी आता होत आहे,
तू मात्र आता भेटाया कवितांचे बहाणे करून आसवांचे शब्द करू नकोस..!
तुझा स्वप्नातल्या हळुवार क्षणांना आता मी घातला आवर आहे,
तू घे बांधिस्त करण्या क्षणांना,तुझ्यात गुंतण्यापासून हळू-हळू मी मलाच आता सावरत आहे..!
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा