शहर आणि माणसे..!
आयुष्याची गणितं जुळवत असतांना जेव्हा कुठेच काही जुळत नसेल तेव्हा अशी वेळ साधून अनोळखी शहरात भटकंती करत आपण आपली वेळ साधायची..!
अलीकडे आयुष्याला घेऊन फार काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीये.त्यामुळं अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये,त्या बघण्यामध्ये आनंद मिळतो.
खरंतर आयुष्याला घेऊन फार विचार केला की आयुष्यात आयुष्याला घेऊन न सुटणारी जी गणितं आहे ती आयुष्यभर नको सुटायला हवी आहे मला...!
कारण जोवर आयुष्यात फरफट आहे तोवर आयुष्यात सुख आहे,नंतर खूप सहज मिळणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठलं सोयरसुतक नसते..!
भर मध्यरात्री असं शांत झालेलं,सिग्नलच्या तालावर ठेका धरून नाचणारं शहर यावेळी खायला उठते,तरीही ते हवेहवेसे वाटते.शांत झालेलं शहर,रस्त्याच्या एकांगाला निवारा शोधून गोधडीत पडलेलं कुणीतरी,रात्रीच्या वेळ कामाला म्हणून जाणारे कुणीतरी,इतक्या रात्रीही रस्त्यावर भुंकणारी कुत्रे,शहराच्या एखाद दुसऱ्या भागाला फिरणारी माझ्यासारखी भटकी माणसे..!
या सगळ्यांच्यामुळे काळोखाच्या राती शहर अजूनच भयाण,उद्वस्थ झालेलं वाटत असतं.त्याच माणसांमुळे दिवसभर शहर त्याची कथा लोकांना सांगत असते,काळोखाच्या वेळी माझ्यासारखे वाट चुकलेले मांणसे आपल्या दर्दी कहाण्या शहराला पायी भटकंती करत सांगत असतात..!
दिवसभर लोकांच्या मनोरंजन करणाऱ्या फ्लेक्स काळोख रात्री मात्र जमिनीवर येऊन आपल्याशी खेळू,बोलू लागतात अन् आपल्या आयुष्याचा खेळ करून टाकतात.तितक्याच सहज जितक्या त्या फ्लेक्सवर असलेल्या सुशांत सिंगच्या आयुष्याचा झाला,त्यामुळं शहरं अजूनच भयाण भासू लागतात अश्यावेळी..!
शहरात जोवर सांजेच्या वेळी असो की फिरायच्यावेळी शहरातील भटक्यांची अन् फिरणाऱ्यांची वजाबाकी,बेरीज जुळते आहे तोवर आयुष्याची अन् शहराची गणितं जुळत राहतील..!
एकदाका ही गणितं बिघडली त्या दिवशी हे शहर शहर नसेल इथे मग फक्त आयुष्यभर आयुष्याला घेऊन असणारी गणितं सोडवणारी माणसे असतील.ज्यांच्या जगण्याला दुःखाची किनार नसेल,सुख असूनही ते सुखाचा शोध घेत राहतील ठरल्यावेळी पुन्हा पुन्हा..!
त्यामुळे माणसे जोडायला हवी आहे,काळोखाच्या राती ही गणितं जुळवून बघायला हवी,जोवर गणितं नाही जुळत तोवर आयुष्य सुंदर आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा