मुसाफिर - संगतीने प्रवास
काल सायंकाळी मिळालेलं एक सुंदर सरप्राईज..!
Patni,Syntel,L&T,Infotech,Apar,Disha अश्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असतांना ज्यांचा जगभराच्या अनेक कंपन्यांमध्ये पट वाढीसाठी सक्रिय हातभार होता.
Soft Excel Consultancy Services या कंपनीचे असलेले ते मॅनेजिंग डायरेक्टर.सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत,इंग्लंड आणि अमेरिका,जपान येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत त्यांना ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा त्यांनी केलेला प्रवास..!
त्यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात केलेलं लेखन-स्तंभलेखन. "बोर्डरूम","नादवेध" "मुसाफिर","अर्थात" आणि 'किमयागार' ही आणि इतर बरीच त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके.विज्ञानाइतकीच ज्यांना तत्त्वज्ञान,भारतीय संगीत,इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे..!
टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची Oprating Systems,Data Communication & Networks,Web Technologies आणि Dimistifaing Computers या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन.या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत झालेला अनुवाद.आज जगभरात महाविद्यालयात या पुस्तकांना टेक्स्टबुक म्हणून मिळालेला मान..!
हे सर्व मी सांगतो आहे,
अलीकडे एक साध्या गोष्टीवर खूप विचार केला की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला ई-मेल करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन करावा लागतो की मी ई-मेल पाठवला आहे तुम्ही बघून घ्या..!
तर "अच्युत गोडबोले" सरांचे मुसाफिर वाचून झाले आणि मनाशी ठरल्याप्रमाणे मला पुस्तक कसे वाटले यासाठीचा अभिप्राय म्हणून सरांना मी ई-मेल केला.मलाही खात्री होती की सर दोन-तीन दिवसांत आपल्या ई-मेलला उत्तर देतील.कारण त्यांनी अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात केलेलं काम अन् शिस्तप्रिय असणं,नियमबद्ध राहण्याची त्यांना लागलेली सवय..!
अखेर काल सायंकाळी सरांचा मला ई-मेल आला,माझ्यासाठी हे खूप भारी फिलिंग होते.मी दिलेला अभिप्राय सरांना इतका आवडला की सरांनी माझ्याशी बोलण्याची अन् पुढे भेटण्याचीसुद्धा इच्छा व्यक्त केली..!
आज काही वेळापूर्वी सरांशी कॉलवर बोलणं झालं.दिवसभर विचार करत होतो साहित्य क्षेत्रात,कॉर्पोरेट क्षेत्रात इतका अनुभव असलेल्या व्यक्तीशी आपण काय बोलाव.त्यात मी खूप कमी बोलणारा,त्यामुळं धाकधूक होती की सर माझ्यासारखेच कमी बोलणारे असेल तर काय होईल,अखेर फोन केला..!
अन् मग शिक्षण,करिअर,माझ्या क्षेत्रात असलेल्या संधी याबद्दल सर भरघोस बोलले,पुढे लवकरच सर त्यांचे पुस्तकही पाठवणार असेही म्हंटले.हे ऐकुन भारी वाटले कारण एका लेखकाचे पुस्तक त्याने आपल्याला अभिप्रायार्थ भेट द्यावे या पेक्षा एका वाचकाला अजून काय हवं असते.त्यांचे पुस्तकं कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे,स्वस्तात कसे मिळतील हे सर्व त्यांनी मला सांगितले
त्यानंतर..!
सरांना जेव्हा मी सांगितले की मी औरंगाबाद येथील आहे तेव्हा सर म्हंटले मी तर कालच औरंगाबाद येथे होतो.तेव्हा सरांना भेटण्याची एक संधी आपण गमावली असं वाटून गेलं पण पुढे सर हे ही म्हंटले की आता कायम एकमेकांशी कनेक्ट राहू..!
पुढे औपचारिक गप्पा झाल्या अन् फोन ठेवल्या गेला,हे सर्व खूप भारी आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा