पुस्तकाच्या कथा..!
कितीवेळ झाला खिडकीत बसून आहे.सकाळ दुपारच्या वेळेकडे ढळायला लागली की खिडकीत बसून बाहेरचं जग न्याहाळत रहायला आवडतं.अनोळखी माणसांत ओळखीची माणसं दिसू लागतात,घरात विस्कटलेली सर्वच पुस्तकं कित्येक दिवस तशीच पडून आहे.त्यांना आवरायला घ्यावं तर दिवस मावळतीला जातो..!
पुस्तकांच्या सहवासात जगणं आहे,त्यामुळं कॉटवर एखाद-दोन पुस्तकं अर्धवट वाचून गेली कित्येक दिवस सोडून दिली,जी तशीच पडून आहे.एक ६७ तर एक १८३ पान नंबर वर वाचायचं चालू आहे..!
काही लेखक मला भयंकर नकोसे वाटतात.मुळात त्यांनी पुस्तके फक्त प्रसिद्धीसाठी काढले की फक्त पैसा आहे अन् तो मार्गी लागेल म्हणून काढली.हे कोडं मला गेली काही दिवस सुटत नाहीये..!
काही महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट म्हणून एका विदेशातील मित्राने मला एक मराठी पुस्तक पाठवलं.त्याला माहित आहे मला इंग्रजी भाषेत काहीही एक कळत नाही म्हणून त्यानं मला ते मराठी पुस्तक पाठवलं असावं..!
मला वाटलं होतं तो इंग्रजी पुस्तक पाठवेल अन् मी तोडकंमोडकं का होईना समजून घेत ते वाचेल.काही दोन-चार दिवसांपूर्वी स्पष्टच झाले की मी फक्त अनुवादित पुस्तके वाचू शकतो.हे स्पष्ट झाले तेव्हा मी पुस्तक वाचत नव्हतो तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता.
आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही जाणीव होणं महाभयंकर वाईट्ट आहे..!
असो मित्राने जे पुस्तक पाठवलं ते अजुन पार्सल बंद आहे.लवकरच ते वाचून त्याला कळवायचे आहे,कदाचित माझा पुढचा वाढदिवस येऊन जाईल तोवर.तो त्याच्या आयुष्यात खूप व्यस्थ असल्यानं त्याला याचा विसर पडला असावा,मला वाचून त्याला सांगायला हवं आहे..!
काल-परवा आठ दिवसांनी घराबाहेर पडलो.तेव्हा दोन तास मी फक्त रस्त्यावर जुन्या पुस्तकांचा स्टॉल असलेल्या ठिकाणी जावून पुस्तकं न्याहाळत बसलो होतो.दोन पुस्तकं पसंतीस पडले पण खिश्यात पैसेच नव्हते,मग मनातच हसलो अन् मनाला म्हंटले जुने पुस्तकं खूप आहेत ते वाचून घेऊ,मग हे पुस्तकं घेऊ.
तोवर मला नाही वाटत की ते इथे विक्रीला उपलब्ध राहतील..!
माझ्या चेहऱ्यावरील उधारीचे भाव ओळखून सत्तरीतले उस्मान चाचा म्हंटले की,
पसंद है तो लेके चले जाओ यह कीताबे,हिसाब का बाद में लेख लेंगे..!
उन्हे दिलसे चाहनेवाला मिल जायेंगा,और धूल-मिट्टी में समीटी हुई यह किताबें प्यार करनेवालोंके घर मे चली जायेंगी..! नहीं तो एक दिन कबाड में रेहकरही सड जायेंगी,नहीं तो रद्दी मे चली जायेंगी..!
मी मानेनं नको म्हणत तिथून निघालो,त्यानं पुढचं वाक्य बोलून दाखवलं,
यंह कीताबे बेचनेवाले और कीताबे लेकर पडनेवाले दोनो पैसोंसे नंगे होते हैं..!
यह जमानेसे चलता आ रहा है,लेकीन दोनो पैसोंको लेकर (व्यवहार) ईमानी होते हैं और दिल के नेकदील इंन्सान होते है..!
मी आवरते घेत निघणार तितक्यात त्यांनी त्यांची बसायची लोखंडी खुर्ची मला दिली.जवळच असलेल्या चहावाल्या अली भाईला दोन चहा सांगितल्या.
चहा आलला,चहा घेतला. उस्मान चाच्याने निघायच्यावेळी बळजबरी मला हवी ती दोन पुस्तकं अन् एक त्यांच्याकडून भेट म्हणून अशी तीन पुस्तकं मला देऊ केली..!
मी माझ्या बॅगेत ते ठेवले आणि पैसे आठ दिवसांनी देईल म्हणत निघालो ते थेट घरी येऊन थांबलो.प्रश्न खूप होते,सत्तरीचे उस्मान चाचा फक्त पुस्तकं विकत नव्हते तर पुस्तकं जगत होते..!
आता हातात पुस्तक घेऊन बसलो पण आयुष्याची काही गणितं छळता आहे.त्यामुळे पुस्तक वाचनात मन लागत नाहीये,खिडकीतून बाहेरचं जग बघत बसलो आहे.मित्रानं पाठवलेलं पुस्तक वाचून त्याला सांगायचं आहे कसं वाटलं ते पुस्तक..!
कदाचित त्याला ते ऐकायचंही नसेल,कारण त्यानंतर कित्येकवेळा कॉलवर बोललो आम्ही पण पुस्तकाचा विषय काही त्यानं काढला नाही की मी वाचले नाही म्हणून मी ही नाही..!
त्यानं हजारो किमी दूर परदेशातून मला जर पुस्तक पाठवलं असेल तर ते कसे आहे,कसे वाटले हे त्याला सांगायला हवं आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा