आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री. "माधवी देवळाणकर" यांचा "प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट मिळाला.
खरंतर मॅडमना हा काव्यसंग्रह मला भेटून देण्याची इच्छा होती अन् मलाही तो त्यांच्या हातानेच हवा होता..!
परंतु,मॅडम अनेकदा औरंगाबाद येऊनही काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होवू शकली नाही अन् मग अनायसे मॅडमला हा त्यांचा काव्यसंग्रह मला पोस्टाने पाठवावा लागला अन् अखेरीस तो मला मिळाला..!
खूप सुंदर,मनातील अलवार भाव भावनांना शब्दांची जोड देऊन त्या शब्दांची गुंफण करून काव्य संग्रहातील प्रत्येक ती प्रिय एक ओळ,एक एक रचना करत हा काव्यसंग्रह आकाररूपास अाला आहे..!
प्रत्येकाला वाचावासा वाटेल असा हा त्यांचा काव्यसंग्रह..!
आठ-दहा दिवसांपूर्वी काव्यसंग्रह मिळाला पण माझ्या इतर कामाच्या व्यस्थतेमुळे तो वाचायची इच्छा असूनही वाचल्या जात नव्हता.परंतु अखेरीस काल सायंकाळी वाचायला घेतला अन् एका बैठकीत वाचून संपवला.
९६ पानांचा का काव्यसंग्रह त्यातील कवितांप्रमानेच नाजूक अन् छोटासा आहे,बोलकेसे मुखपृष्ठ संग्रहाची शोभा वाढवते.औरंगाबाद येथील "गोदा प्रकाशन" यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.प्रसिद्ध साहित्यिक "डॉ.कैलास अंभुरे सर" यांची खूप अभ्यासपूर्ण प्रस्तावना या काव्यसंग्रहाला मिळाली आहे ..!
काव्य संग्रहातील काही रचना खूप गहन अन् अर्थपूर्ण अश्या विचार करायला लावणाऱ्या आहे.काही रचना या हळुवार आपल्या मनास रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहेत.की प्रेम ही भावना किती सुंदर आहे अन् ती किती समर्पकपणे कवियित्रीने आपल्या प्रत्येक रचनेत कैद केली आहे..!
सारे सारे संपले जरी
तरी तुझेच नाव
अंतिम श्वासापर्यंत ओठी
एक चुकार क्षणी
जर भेटलोच कधी
तर एक स्मित येऊ दे
ह्या आपल्या वेड्या ओळखीसाठी
म्हणून प्रिय...
ही एक ओळ तुझ्यासाठी...
काव्यसंग्रहाचे एक विशेष मला खूप जवळचे वाटले अन् यातूनच कवियित्री आपण साकारत असलेल्या प्रत्येक रचनेवर,ज्यांच्यासाठी हा काव्यसंग्रह अर्पण करते आहे त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करते हे दिसून येते.
संग्रहातील प्रत्येक रचनेचा शेवट हा काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या "एक ओळ तुझ्यासाठी" या ओळीने होते अन् ही फक्त एक ओळ नसून संपूर्ण एक काव्यसंग्रह आहे..!
काव्यसंग्रहाचे विशेष कौतुक यासाठीही मला वाटते की कवयित्री "माधवी देवळाणकर" यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह.
"कैलास अंभुरे सर" प्रस्तावनेत ज्याप्रमाणे म्हणतात की व्यवहारी जगात पहिलं असणं...पहिलं येणं जसं महत्त्वाचं तसंच जगातील पहिलं प्रेम... पहिल्या प्रीतीची अनुभूती... पहिला विरह... पहिली मैत्री... इत्यादी स्वजीवनातील पहीलेपणाच्या स्मृतींचा दरवळ मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजून बसलेला असतो.
त्या अलवार,आल्हादायक स्मृतीचेतना 'स्व' ला प्रसन्न करतात. तर कधी दुखय्रा खपल्या अस्वस्थ करत.स्वस्थअस्वस्थता,ऊन-सावल्या,सुख-दुःखात्म स्मृती भावतरंग हा कवीयित्री माधवींच्या "प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी" चा गाभा आहे..!
कवियित्री त्यांचे मनोगत व्यक्त करतांना शेवटच्या तीन ओळींत लिहतात की,
"प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी" काव्यसंग्रह आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद आहे.तिचे हितगुज चोखंदळ वाचकांना कितीपत रुचते हा निर्णय मी रसिकांवर सोडून थांबते..!
आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद काव्यसंग्रहाच्या शेवटच्या रचनेपर्यंत आपल्याला रूचलेली असते अन् हा काव्यसंग्रह पसंतीस उतरलेला असतो.खूप सुंदर,खूप आवडलेला काव्यसंग्रह..!
खूप प्रेमासह खूप शुभेच्छा,असेच लेखन तुमच्या माध्यमातून मराठी साहित्यात होत राहो..!
लेखक-भारत सोनवणे.
संपर्क-९३०७९१८३९३.
औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा