भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
तू सोसले घाव जगाचे,अन् पिढ्यानपिढ्या चालू असल्या वाईट व्यवस्थेचे...!
भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
भीमा तु लाविले वृक्ष ज्ञानाचे,घडविण्या अशिक्षित समाजा,अंधश्रद्धा,बालविवाह,या प्रथास बंद पाडण्या...!
भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
भीमा तु दिले संविधान या देशालाहक्क त्यातूनी तु दिदला सामान्य जनतेला, माझ्या सारख्या मागासलेल्या जातीच्या गरीब लेकराला...!
भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
भीमा तुच दिला संदेश मजला जगण्याचा अन तूच दाखविला मार्ग यशस्वी जगतात या होण्याचा...!
भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
भीमा मी सोवळे तुझी गातो,हाती तू दिलेली शिकवणीची,संस्काराची शिदोरी घेऊन लेक मी भीमाचा म्हणुनी मलाच जगात आता मिरवितो....!
भीमा तुझ्यामुळे जीवन माझे धन्य झाले,
जन्माचे माझ्या तुझ्यामुळे सोहळे झाले...!
नाव: भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).
संपर्क:९०७५३१५९६०.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा