अनेक प्रश्न अनेक गैरसमज मनात घेऊन कधीतरी आपण या सागर किनारी येऊन बसतो.प्रश्नाची उत्तरं काही भेटणारी नसतात,पण उगाच मनाची खोटी समज काढून आपण काही क्षणांचा एकांत भेटावा म्हणुन आपण न्याहाळत बसतो या विस्तीर्ण सागर किनाऱ्याला....
आपले अस्तित्व आपण या विस्तीर्ण सागरामध्ये शोधत बसावे,कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय खुप दूरवर तो जवळ यावा मला त्याच्यासोबत पार आत-आत घेऊन जावा. तो वर जोवर माझी उत्तरे,माझे अस्तित्व मला भेटणार नाही.....
ज्याप्रमाणे या सागरामध्ये मोडकळीस आलेली धरणातली नाव तिचा प्रवास दिगंतर करू शकत नाही.तसेच माझे सुद्धा झाले असावे,मी जरी माझे अस्तित्व या समुद्र किनारी त्या जहाजेत प्रवास करून खुप आत पर्यंत जाऊन शोधणार आहे....
पण ते खरच मला भेटल का ? जरी भेटले मग ते क्षणिक असेल, पुन्हा मी किनारी येईल तोवर करमेल मला जोवर मला ते अस्तित्व दिसतंय....
परतीच्या प्रवासाला मात्र कुठेतरी त्याची अनुपस्थिती मला स्वीकारावी लागेल,मग पुन्हा ते दुःख पुन्हा तोच शोध अस्तित्वाचा....
मग पुन्हा एक दुपार सागर किनारी,माझे येऊन बसणे शोधात अस्तित्वाच्या व माझा त्या मोडकळीस आलेल्या नावेचा....
#भेटपुन्हाएकदाशोधार्थहरवलेल्यानावेच्याअन अस्तित्वाच्या....
Bharat Sonwane

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा