कंपन्यामध्ये काम करण्याचा माझा अनुभव जेमतेमच आहे,पण जो आहे तो खुप छान आहे.
शिस्त,वेळेचे महत्त्व,इत्यादी गुण आपल्याला रोजच्या जीवनात जर अनुभवायचे असेल तर खरच एकदा तरी हा अनुभव घेऊन बघावा....
मी आजवर काम केलेल्या कंपनीमध्ये मला आवडलेलं कंपनी क्षेत्र जर कोणते असेल तर ते फार्मा कंपनी.शिस्तबद्धता,वेळेचे नियोजन,अजुनही असंख्य नियम या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना लागु असतात....
अगदी House keeping मध्ये काम करणारा असो किंवा सर्वोच्च पदावर काम करणारे सर्वांसाठी सारखे नियम येथे असतात.तर थोडक्यात माहिती या कंपनींच्या नियमांबद्दल व येथे चालणारे काम कसे चालते याबद्दल....
फस्टशिप(सर्व शिपमध्ये असेच काम होत असते, फक्त कामाचे नियोजन व एमरजेंसीमध्ये यात वेळेनुसार बदल होत असतो)मध्ये जर तुम्ही काम करत असाल,तर कसे असते तुमचे एकुण 9.00 तासांचे कामाचे नियोजन ते खालीलप्रमाणे असते.फस्टशिपमध्ये काम करण्यासाठी तुमची वेळ असेल सकाळी 6.30 ते दुपारी 3.30....
सर्व प्रथम नियोजित वेळेवर तुम्ही कंपनीच्या मेन गेटवर असायला हवे. तुमचे राहणीमान दाढी,कटिंग व्यवस्थित असावं,नख कापलेली स्वच्छ असावी,गळ्यात ओळखपत्र,पायात सेफ्टी शुज,अंगावर असलेले कपडे फार तंग नसावे व स्वच्छ असावे,मोबाईल,व्यसनी,आम्लीपदार्थ कंपनी आवारात आणण्यासाठी सक्त बंदी घालण्यात आली आहे.तेव्हा हे आढळले तर डायरेक्ट नौकरीवरुन तुम्हास बडतर्फ केले जाते.शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर सेक्युरीटी गार्डशी संबंधित विषयी बोलावे लागते,या नियमांनमध्ये बसत असल्यावरच कंपनीच्या मधील आवारात तुम्हाला प्रवेश भेटत असतो....
कंपनीच्या मेन गेटवर तुमची सेक्युरीटी गार्डकडुन तपासणी होते(वेळ7.00)आपण पात्र ठरलो.मग कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आपण आपली हजेरी लावण्यासाठी ठरवुन दिलेल्या ब्लाॅकला जाऊन हजेरी मशिनवर हजेरी लावायची आहे.(येथुन आपला कामाचा कालावधी चालु होतो)...
सर्व प्रथम कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जाऊन आपल्याला ब्रेकफास्ट करायचा असतो.(नियोजीत वेळ15मिनीटे)कॅन्टीनमध्ये गेल्यावर लाईनमध्ये शिस्तीत उभे राहुन,नंबर आला की प्लेट मध्ये दीलेला पदार्थ,सोबतीला असलेला चहा घेऊन आपण शिस्तीत टेबलवर बसून तो खायचा/प्यायचा आहे.मग आपली प्लेट,ग्लास बेसिनविंडो एरियात नेऊन ठेवायची,व्यवस्थित हात धुवून नंतर नियोजित कामाचा स्थळी ब्लाॅकला आपल्याला जायचे असते....
वेळ(7.15ते7.30)ब्लाॅक गेटसमोर असलेल्या रबर मॅटवर आपले शुज घासुन आत प्रवेश केल्यावर,सर्व प्रथम बाथरूममध्ये जाऊन आपण पुन्हा आपले हाथ धुवून स्वछ करायचे आहे.जनरल एरीयात गेले की आपण आपल्या ड्रोवरमध्ये आपली घड्याळ,पाॅकेट,इत्यादी काढुन ठेवायचं आहे....
मग प्रायमरी एरीयात जातांनी कंपनीचा विशेष गणवेश(फोटोत दाखवल्याप्रमाणे)घालून आपल्याला आत जायचं आहे.आत जातांनी आरशात आपण गणवेश व्यवस्थित वेअर केले आहे की बघावं,अन् पुन्हा एकदा जंतु विरहीत हात राहण्यासाठी ठेवलेल्या द्रावनाने स्प्रेने हात पुसुन घ्यायचे आहेव आत जायचे आहे....
आपल्या कामाची सुरुवात होते( वेळ7.30), नियोजुन दिलेल्या वेळेत सुपरवायझरची परवानगी घेऊन जेवन करण्यासाठी येताना,पुन्हा सर्व नियम पाळत आपल्याला प्रायमरी एरीयातुन जनरल एरीयात यायचं आहे.आल्यावर विशेष गणवेश योग्य पध्दतीने काढुन डजबीन मध्ये टाकुन ड्रोवर मधुन आपले साहित्य घेऊन पुन्हा बाथरूम मध्ये जाऊन तोंड,नाक,हात स्वच्छ धुवून फ्रेश व्हायचं आहे....
ब्लॉकच्या बाहेर येताना शिस्तीत यायचे आहे, गळ्यात ओळखपत्र घातलेले असावे.कॅन्टीनमध्ये आल्यावर व्यवस्थित रांगेत उभे राहायचे आहे, नंबर आल्यावर जितके लागेल तितके घेऊन मोठीप्लेट शिस्तीत हातात पकडायची आहे. अन् शिस्तीत टेबलवर बसून तीस मिनिटांमध्ये जेवण करायचे आहे.जेवण झाले की आपली प्लेट
बेसिन विंडोमध्ये ठेवायची आहे.अन् पुन्हा पाणी पिऊन ब्लॉकला कामाच्या स्थळी जायचे आहे.ज्या पद्धतीने आपण आधी आत गेलो आहे तसेच जायचे आहे....
कामाचा कालावधी समाप्त होतो.(वेळ3.15)आधी सांगितल्या प्रमाणे बाहेर येऊन पुन्हा बाथरूममध्ये फ्रेश व्हायचे आहे व आपल्या कॉन्ट्रॅक्ट ज्यांचाकडे आपण काम करतो ज्यांचा आहे त्या ऑफिस वर येऊन थांबायचे आहे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन घेऊन शिस्थिती रांगेत चालत हजेरी मशीनला कार्ड दाखवून(वेळ3.30) गेटवर येऊन उभे राहायचे आहे. सेक्युरीटी पुन्हा आपली तपासणी करेल व आपली सुट्टी होईल....
(वरील सर्व नियम कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्वांना अवलंबून असतात)....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा