#मृगजळ_कवितांचं...
अवांतर न बोलायचे हल्ली पाळतो मी,
सल्लेच एरवी इतरांचे घेणं टाळतो मी..!
माझाच भ्रमनिरास होतो वर्तमानात माझ्या,
तुर्ताच तरी भविष्यावर बोलायचे टाळतो मी..!
हल्ली स्वप्नांचे ओझे मानगुटीवर घेऊन वाहत नाही मी,
कल्पनेत रमणाऱ्या स्वप्नांकडे हिशोब उद्याचा मागत
नाही मी..!
रास्त आहे हिशोब बळजबरीच जिंदगीचा सुखाशी
लावणे आता,
दुःखात सुख शोधायचे जिंदगीशी केलेला करार हा
खोटा टाळतो मी..!
हरवली आहे जगण्यात असलेली इतरांकडून अपेक्षा,
त्यांनाच शोधण्या अलीकडे भूतकाळात
रमतो मी..!
नित्याचीच कविता माझी बहरत जावी,
म्हणूनच हल्ली खोट्या जीवन प्रवासात कवितेलाच
टाळतो मी..!
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा