#हो_हल्ली_अंधारच_दिसतो_मला...
काय आहे या फोटोत ?
हाच फोटो Pinterest वर जेव्हा मी बघितला तब्बल दोन तास त्याच्या वर्तुळात असलेल्या सर्व फोटोज् ला मी बघत बसलोय....
कुठेतरी भूतकाळात घेऊन जातो हा,जिथे सर्वच ब्लॅक आहे जे व्हाइट होऊ बघत आहे..
माझच लिखाण हल्ली मला भीतीदायक वाटू लागले आहे म्हणून वाचण्याचे,वाचणाऱ्या सर्वांचे मार्ग मी बदलून टाकले आहे...विचार बदलले,लिखाणाची वैचारिक पातळी बदलली की काहीतरी मागे राहिल्या सारखे वाटते,कुठेतरी काहीतरी हरवलंय अन् अलिकडे तेच शोधतोय....
विचारांच ब्लेंक होणं माणसाला खूप काही शिकवत असतं,एकाच वेळी काय हवंय,कोणासाठी,कश्याला,अन् का ही प्रश्न पडली की त्याला उत्तर द्यायला नाही जमत...
काय आहे फोटोत ?
अंधार आहे,जेव्हा डोळ्यांना फक्त अंधारच दिसतो त्यावेळी त्यांना फक्त अंधारच दिसणार आहे.त्यांना उजेड नाही दिसला,त्यांना ब्लॅक अँड व्हाईट असलेलं एका माणसाचे चित्र नाही दिसले,जो खूप उंच आहे केस वाढले, ब्लेझर घातलेले आहे त्याने इतके सर्व नाही दिसले...
बरे हे सर्व ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेऊन देऊ,फोटोत सकाळच्या प्रहरी पडणारे कोवळे ऊन जे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडत आहे तेही नाही दिसले...
काय दिसले तर फक्त अंधार...
ही जी अवस्था आहेना,ती गूढ वलयात सध्याचं तुझं हरवून जाणे आहे..
इथे तुला काही नकोय,तुला कुठेही फक्त अंधारच दिसेल तेव्हा हे गणित काही दिवस अंधार बघूनच सोडवायचे आहे जोवर तुला तुझा उजेड
दिसत नाही....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा