तो मला आज भेटला, ऐकुन खूप होतो त्याच्याबद्दल पण कधी वाचले नव्हते त्याला आज जेव्हा त्याच्या जन्मदिनी सर्वच एका पेक्षा एक सरस लेख त्याच्यासाठी लिहत होते, तेव्हा मी काहीच
लिहू शकत नाही...
नाही... खरेतर हे शक्यच नाही, पण मग सूरवात कुठून करायची हे सुचत नाहिये म्हणजे त्यांच्याबद्दल, त्यांना वाचण्यात लोकांच्या उभ्या हयाती गेल्या त्यांना मी आज एक दिवसात कसे ओळखू शकतो...
दिवसभर त्याच्याविषयी जे हातात पडल ते अधाश्यासारखे वाचून संपवत होतो...
इतक्यात ते मला उलगडलेले पूर्णपणे की मीच त्यांना जाणून घेण्यात विचाराने अपूर्ण आहे याचे उत्तर मलाच माहीत नाही, किंवा मलाही कळाले नाही अजुन तरी...
आज जे भेटलं ते सरसर वाचून मोकळे होऊन जायचे आहे, मग बऱ्याच आकृती मनात येईल त्या जश्या वाटेल तश्या एका कॅनव्हासवर उतरवायच्या आहे... तो राग आहे की आनंद माहीत नाही कदाचित आज खूप काही भेटलं आहे, हाती लागले आहे त्याचं गणित उलगडत नाहीये, म्हणून असलेली विचित्र Excitement असेल पण ती उलगडणारी नाहीये.
म्हणूनच आज कॅनव्हासवर खूप काही मनातले उतरवणार आहे,ते चित्ररूपात मी किती सरसपणे उतरवू शकेल माहीत नाही पण त्यांना ते उमगले असतेच हे मात्र खरे...
सांजेच्यावेळी जेव्हा भर पावसात काळ्याशार ढगांतून पाऊस बरसू लागलाय अन् मी फक्त खिडकीच्या पडद्या आडुन बसून त्याला बघत बसलोय. कधी ग्रेस आठवून जात होते तर कधी त्यांच्या कविता...
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने..!
आज जेव्हा थोरो उलगडू लागले होते बरोबरच या लेखांमध्ये ग्रेसही दिसू लागले होते, काय असेल या दोघांचे साम्य मला माहीत नाही... पण नजरेच्या कॅनव्हास मध्ये एकच आकृती वेळोवेळी काढली जात होती कधीतरी तिला ग्रेसांच्या आठवणीत रंगवून टाकत होतो, तर कधी थोरोंचा आज नव्याने उलगडनारा इतिहास लेखन, कविता यांची आकृती काढत होतो...
हेन्री डेव्हिड थोरो, अमेरिकेतील एक लेखक, कवी आणि विचारवंत.
जन्म: १२ जुलै १८१७ मृत्यु: ६ मे १८६२ आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते.ते आपल्या वाॅल्डन पुस्तकासाठी जे की निसर्गाच्या सनिध्यातील साध्या राहणिमानाबद्दल आहे.ते नेहमीच पुस्तकांसाठी चर्चेत राहिले
कंकाॅर्ड येथे आरंभीचे काही शिक्षण झाल्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठातून १८३७ मध्ये ते पदवीधर झाले.त्यानंतर थोडे दिवस शिक्षकाची नोकरी केल्यानंतर पेन्सिल तयार करण्याच्या वडिलांच्या व्यवसायात ते त्यांना साहाय्य करू लागले. कंकाॅर्ड आणि मेरिमॅक ह्या नद्यांतून त्यांनी नौकाभ्रमण केले...
"आपला पिंड शिक्षकाचा नसून कवीचा आहे, ह्याची जाणीव ह्या नौकाभ्रमणाच्या अनुभवातून त्यांना झाली आणि ते कविता करू लागले. १८३७ च्या सुमारास विख्यात अमेरिकन निबंधकार आणि विचारवंत एमर्सन ह्याच्याशी त्याचे घनिष्ठ स्नेहसंबंध जुळुन आले, त्यांच्या विचारांचा प्रभाव थोरोंवर पडला होता.
मग सुरू होतो प्रवास एकांताचा थोरोंना 'स्व' येणारा विचार मग पुढे एका झोपडीत एकांतवासात त्यांनी आपले जगलेले जीवन... यातुन त्यांच्या निसर्गोपासनेमागे मानव आणि निसर्ग ह्यांच्यातील मूलभूत आणि निकटच्या नात्याची त्यांना होणारी जाणीव,त्यामुळे जुन्या काळाची काही अंगे त्यांना महत्त्वपूर्ण वाटु लागली.माणुस अन् निसर्ग यांच्यातील तफावत त्यांना उलगडु लागली अन् त्यातुन निर्माण होवू लागला एक लेखक,कवी आणि विचारवंत अमेरिकन समाजापुढे एक साधेसुधे जीवन कसे जगावे याचा आदर्श त्यांनी दाखवून दिला...
पुढे क्षयाच्या विकाराने थोरो यांचे कंकाॅर्ड येथे निधन झाले.पुढे त्यांच्या कविता,प्रवासवर्णने,टिपणवह्या असे त्याचे काही साहित्य त्याच्या मरणोत्तर प्रकाशित झाले.त्यांच्या समग्र लेखनाच्या अनेक संपादित आवृत्त्या निघाल्या. त्यांपैकी विसाव्या खंडांत प्रसिद्ध केलेली वॉल्डन आवृत्ती विशेष प्रसिद्ध ठरली आहे."
जीवनपट:अ.र.कुलकर्णी.
आज वाचनात आलेले त्यांच्यासाठीचे हे पत्र...
माय डियर थोरो ,
वॉल्डन च्या किनारी झालेली भेट अजून स्मरणात आहे...माहित नाही आपण तेव्हा नेमकं कशाविषयी बोललो,तू उगीच झाडाखाली बसून झाडाचं पान झालेलास,आणि मी रंग शोधत होतो तुझ्यात,झाडात,तलावामध्ये...
तुला माहितेय मला हा तलाव,ही झाडे हे सगळे खूप खूप आपलेसे वाटतात इतके की आपण स्वतःला ओळखत नाही आहोत,पण ह्यांना ओळखतो. इथला सूर्यप्रकाश पण माझ्या सांगण्यावरून, झाडांवरून माझ्या कॅनव्हास वर पसरतो आणि तू शोधत असलेला साधेपणा, ह्या साधेपणाचा रंग,माझेच रंग कधी स्वतःच लावून घेतात खरंच मलाच कळत नाही...
वॉल्डन च्या किनाऱ्यावर त्या रम्य क्षणांची आठवण म्हणून हे पत्र लिहल,उद्या परत जाडजूड कॅनव्हास घेऊन सूर्यप्रकाश रंगवायला जाईन. तुला माहितीये,आपण झुरिक मध्ये इम्प्रेशिनिसम विषयी बोलताना बोललेलो की," तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं काढायला जमलं ना की खरं चित्र बोलू लागत.."
तुझं असणं कळवत रहा...
तुझा...
व्हॅन गाॅग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा