अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!
मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं.
आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं.
असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं.
कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा जगण्यासाठी शिकत असलेली गणितं का होईना.
तर हल्लीना अनेकदा नोटीस करतो की, काही जवळचे मित्र- मैत्रिणी व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकलं की दुसऱ्या क्षणाला ते डिलीट करतात. ते दोन-तीन मिनिटे राहिलेलं स्टेटस अनेकदा त्या मिञ-मैत्रिणीच्या आयुष्याची गणितं तिच्याकडून सांगणारे असतं. ती शोधत असते आपल्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे. अश्यावेळी या मिञ-मैत्रिणीला अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीशी हे प्रॉब्लेम शेअर करायचे असतात.
हे जे मित्र असतातना ते फार बोलके नसतात अन् मग ते हे असा स्टेटसचा खेळ करत बसतात. त्यातून स्वतःला खोटी समजूत घालत बसतात. मग त्यांचं हे आयुष्याचे गणित घेऊन टाकलेलं अन् पुढच्या काही मिनिटांत डिलिट झालेलं स्टेटस माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीने बघितलं की अनेकदा बोलण्याचा प्रयत्न होतो.
अनेकदा त्यांचं हे असं स्टेटस टाकणं ते प्रॉब्लेम फेज करत आहेत हे सांगतही असतं. मग अश्यावेळी माझ्यासारख्या मित्राला ती वेळ साधता यायला हवी. नाहीतर ते स्टेटस बघून जर आपण आपल्या या मिञ-मैत्रिणीला बोललो नाही तर त्यांची प्रॉब्लेम ही अशीच वाढत जातात. मग एक दिवस कधीतरी आयुष्य जगणं त्यांना अवघड वाटायला लागतं.
मग नको ते प्रश्न मनात येतात अन् नको ती उत्तर बावरलेलं त्यांचं मन त्यांना देतं अन् मग सगळं काही मिनिटात संपून जातं.
तेव्हा असे मिञ-मैत्रिणी जोडायला हवी, त्यांची प्रॉब्लेम्स समजून घ्यायची, त्यांच्याशी टाईम स्पेंड करायचा. होत काही नसते, आपण त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही हे त्यांना अन् आपल्यालाही माहीत असते. पण; फक्त आपलं ऐकून घेणारं कुणी असलं की फरक पडतो.
तेव्हा आपण ऐकणारं होऊया, आजवर असे अनेक मित्र-मैत्रीणी भेटले, त्यांचे स्टेटस बघून त्यांच्याशी बोलता झालो. त्यांचे प्रॉब्लेम्स मी Solve करु शकलो की नाही माहित नाही पण; माझं त्यांच्या सोबत असणं आधार वाटतं त्यांना.
खास करून अश्या मैत्रिणी फार वाट्याला आल्या. कारण हेच असेल की, लेखकाच्या मैत्रीणी खूप असतात म्हणून असेल. पण; अलाहिदा हसण्याचा भाग सोडला तर हे खूप खरं आहे.
मुलांच्या बाबतीत एक समजलं मुलं फार संवेदशील अश्या मनाची फार नसतात. अनेकदा त्यांचे हे असे प्रॉब्लेम्स ते चहा अन् सिगारेटच्या एका कशवर सोडवून मोकळे होऊन जातात.
त्यामुळं अनेकदा त्यांच्या बाबतीत आनंद वाटतो पण त्यांचं आयुष्याला घेऊन तुटणे कधी बघितलं तर ते ही खूप वाईट्ट असतं. अनेकदा मित्रमैत्रिणींनो आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पालकांना किंवा Girlfriend, Boyfriend यांना सांगू शकत नसतो किंवा तितका/तितकी तो/ती पात्रही त्यावेळी नसतात. कारण एक हक्काची मैत्रीण किंवा मिञ जितक्या सहज आपले हे प्रोब्लेम समजू शकतात तितके ते नाही.
कारण त्यांच्या इतकं समजून घेणारं अन् त्यांना जितकं शेअर आपण करतो तसे आयुष्यात कुणी नसतं. तेव्हा असं डिलीट होणारं स्टेटस बघून विचारपूस करणारी मैत्रीण अन् मित्र कायम आयुष्यात ठेवा. आयुष्य जगणं सुंदर होईल अन् सहज होईल.
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा