मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

संतूच्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नागू तिच्याकडे बघत बोलू लागला: राणू ठीक हायसा..! दगड फोडायचं काम झालं हायसा आता ती दोन दिवसा महुरं येईल तुझ्या संगतीनं डोईवर वऱ्हाटे, पाटे इकाया.
बोलणं ऐकून संतूची बायको बोलती झाली: ठीक हायसा अण्णा मला बी अक्काच्या संगतीने ई- जा करायला बराबरी होईल. चहा घेतलासा का अण्णा असं संतूच्या बायकोनं विचारलं..!

नागू नकारार्थी मान हलवत म्हंटला नगूया आता गोंडाजी यायला असल सडकी तो आला की जेवण-खावान होतीया मग..!
नागू धोतर सावरत संतूला म्हणतो: येतूया संतू लका, झगडा नग करुस भाडीच्या काम भी कर जरासा..!
संतूनं मुकाट्यानं मान हलवली अन् हु हु करू लागला अन् नागू तिथून झोपडीच्या वाटेनं निघाला.

नागू काही वेळात पाय आपटीत झोपडी लोंग आला अन् त्याच्या झोपडीसमोर असलेल्या बाजीवर बसून वाटेला नजर लाऊन बसला होता.
इतक्यात त्याला दूरवरून खेचरांना हाकरत येणारा गोंडाजी दिसला अन् पाठीशी त्याची बायको सुमन दिसली दिसताच त्यानं रानूबाईला हाक मारली.
राणे अय राणे..!
धाकली जोडी येऊन राहिलीया चुल्हांगणावर पाणी तापाया ठेव. दमली अस्तीला इळभर दगड फोडूनसनी..!
 
रानुबाई उठली भाकरीचं टोपलं महूरं घेऊन तिनं चुल्हांगणावर डेचकीत पाणी तापाया ठेवलं. तितक्यात गोंडाजी अन् सुमन खेचरांना हाकरत हाकरत झोपडी पहूर आली. सुमन डोईवरचा पदर सावरत न्हाणीघरात गेली राणूबाईनं तिला बादलीत पाणी काढून दिलं अन् ती हातपाय धुवू लागली.

नागू बाजीवरून उठून गोंडाजीच्या हातून खेचर घेऊन त्यांच्या अंगावर आणलेल्या वऱ्हाटे, पाट्यासाठी आणलेला दगड निरखून टाके द्यायचं राहिलेल्या दगडात ती दगड रचू लागला. सोबतच गोंडाजीसोबत गाव महूरच्या खदानीबद्दल बोलू लागला. हातपाय धुवून गोंडाजी अन् नागू बाजीवर बसले अन् राणूबाई, सुमन चहा कपात ओतत त्यांच्याकडे देत त्यांच्या मोहरे अंगणात बसले.

इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ लागल्या राणूबाईनं चुल्हीवर कढईत टाकलेलं पिठलं रटारट आळत होतं काही अवधीनं नागू अन् गोंडाजी झोपडीत आले अन् सुमनबाईनं ताट वाढाया घेतले चौघ जमली अन् सुमनबाईने सर्वांना वाढून दिले. जेवणाबरोबर संसाराच्या अनेक गोष्टी चालू होत्या.

आयुष्यात इतके सर्व कष्ट सहूनसुद्धा ते सर्व सुखी समाधानी होते. पिठाच्या डब्ब्यावर ठेवलेली घासलेटाची चिमणी विझायला करत सर्वांची जेवण झाली राणूबाईनं भांड्याचा गराडा महूरच्या अंगणात घेतला अन् दोन्ही मिळून कुणी भांडे घासू लागले कुणी हिसळू लागले. भांडे आटोपून दोघीही काम आवरून झोपडीत आल्या सुमनबाई अन् धोंडाजी परसदारच्या अंगणाला आडोसा केलेल्या वळकटीत झोपी गेले अन् राणूबाई झोपली अन् नागू आपलं पांघरून घेऊन बाहेरच्या खाटेवर पडून राहिला.

काळ्याभोर आकाशात चांदनं लकलकत होती. नागू त्याच्या ह्या संसाराची चमक अन् उद्याची स्वप्ने त्या चांदण्यात विहार करत बघत बसला. जसजशी रात्र सरायला लागली तसे नागूचे डोळे जड पडायला लागली अन् नागू बाहेरच्या खाटेवर झोपी गेला.

पहाट झाली तांबडं फुटलं, कोंबड्यानं बांग दिली तसे राणूबाई उठल्या अंगण झाडून झुडून घेतलं अन् चूल शिलगवून राणूबाईनं पाणी तपाया ठेवलं. एका मागोमाग सर्वांच्या अंघोळी झाल्या सकाळची काम आवरली अन् सकाळची न्याहारी करून दुपारच्या भाकरीचं पेंडकं पोत्यात ठेऊन गोंडाजी अन् सुमन खदानीच्या वाटेनं दगड आणाया निघाली.

टाके द्यायच्या कामाचा उरक आवरता बघून वऱ्हाटे, पाटे घेऊन संतुच्या बायको संगतीने तालुक्याच्या गावाला वऱ्हाटे,पाटे घेऊन राणूबाई निघाली. नागू आपल्या बायकोला नजरेआड जास्तोवर बघत राहिला. इतके वर्ष काहीही तक्रार न करता राणूबाईचं चालू असलेलं काम हे सगळं नागू संतूला सांगू लागला. संतूलासुद्धा आता हे सर्व पटलं होतं, दोघेही एकमेकांच्या नजरा चुकवत आपापल्या झोपडीकडे निघून गेली अन् उरलेल्या दगडांना टाके देऊ लागले, घाव देऊ लागले.

सांज ढळली तसं राणूबाई अन् संतूची बायको माळावरून येताना नागूला दिसली जशीजशी सांज सरत होती तशी राणूबाई आपल्या आयुष्यात तिच्या संसारासाठी झुरत असताना नागुला दिसू लागली होती.

क्रमशः
Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...