नेहमीप्रमाणे मी अन् आई सायंकाळी भाजीमंडी मध्ये भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला आणायला आई सोबत जायचं म्हंटल की मला खूपच जीवावर येतं . कारण आई ४-५ भाज्या घ्यायला कमीत कमी एक तास तरी लावते. म्हणजे भाव वगैरे करत नाही पण व्यवस्थित नीटनेटक सगळं कसं. पण हल्लीना मला आई बरोबर भाजीपाला घ्यायला जाण्यास आवडायला लागलं होते. म्हणजे आई मंडीत गेली की मी तिथंच गाडी लाऊन आजूबाजूच्या लोकांना न्याहाळत बसायचो. कोण कसा बोलतो?कोण काय करतो? कोणाचं कुठे लक्ष आहे?मज्जा यायची यात तर नेहमी प्रमाणे आई गेली मी गाडी लाऊन निरीक्षण करत बसलो होतो.आपण म्हणतो जागतिक मंदी चालू आहे पण इथ असं काही दिसत नव्हते.रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू घेणं समजु शकतो पण लोकांची चैन काही कमी झाली नव्हती. म्हणजे ते देशी दुकानातून दारू पिउन येणारे तरुण,म्हातारी माणसे मस्त कुठलही टेन्शन नसलेली भासत होती. मस्त एक एक शेंगदाणा खात खात गेट बाहेर आले की बाजूला पचकन थुंकत चहूकडे बगत चालत होते,जस की काय आम्ही खुप मोठं कार्य करून आलो. बाजूलाच एक वाइन शॉप पण होत जिथं जरा हाय प्रोफाईल लोकं भारी मधली दारू घेऊन पार्सल कागदात पॅक करून ते पण निघायचे. बाजूलाच काही टपरीवर बसलेली लोक त्यांचे विषय ऐकण्यात मज्जा येत कुणी राजकारण, कुणी घरचं टेन्शन,कॉलेज ची मुलं काही अभ्यास, काही ही अशी ती तशी गोष्टी करत बसलेले,कुणी मात्र कामा निमित्त बसलेलं. कुणी बटर विकत, कुणी करदोरे, लाह्या,बत्तशे,मुरमुरे ,शेव विकत होतं. एकुण काय तर आपला देश किती वेग वेगळे रूप आपल्याला एका सार्वजनिक ठिकाणी दाखुन देतो. हा विचार करत बसलो तितक्यात आई आली होती अन् आता घरी निघायचं होतं.....मग प्रश्न पडून जातो #incrediable India हाच का ?
लिखित: भरत सोनवणे,(सौमित्र). औंरगाबाद.
मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख. खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे... तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा