मुख्य सामग्रीवर वगळा

ती एक अनोळखी लायब्ररीतील पुस्तकीवेडी अन् मी एक शहर हिंडणारा...

या वेळेला कधी कधी मी शहरात फिरायला निघतो  पायी,या मुळे होते काय की आपल्या पासून दुरावलेल्या,त्या खुप दिवसांपासून अनोळखी असलेल्या शहराची आपल्याला नव्यानं ओळख होते.
ती कॉलनी,तो चौक,तो नाका,ते दिवस तरुण- तरुणींनी गजबजलेलं कॉलेज रात्री मात्र शांत अन् विरहाच्या वाटा भेट देणार भासते. ते मंदिर,ते मस्जिद कुणाचा गरिबांचा सहारा होत असते, कुण्या गल्लीने तो गुराखी त्याचं काम करतोय. मी मात्र भटकतोय एकटा एकटा न्याहाळत त्या अनोख्या अन् रौद्र रुप धारण केलेल्या शहराला.तो स्मशान तर काळजात धडकी भरवत आहे, मोडकळीस आलेला त्याचा ही एक जीव येतोय अन् एक जातोय,पण तो ही अजून उभा आहे अनेकांच्या शेवटच्या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी. ते बसस्टँड मात्र निपचित पडलय  कधीच एक दोन तासाला एखादी परी भेटायला येत आहे, मग अनेकांच्या झोपा खुश करून जात आहे,अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे.
सर्व शहर फिरतोय,मग नेहमीच्या त्या सोसायटी जवळ मी आलो जिथं आज पण काही वेगळे नव्हते.वाचमन झोपलाय खुर्ची वर कधीचाच त्यालाही थंडी वाजत असावी,पण जगणे अन् कर्तव्याची विण कुणाला चुकणार,हातपाय पार थरथर करताय तरी तो पार पाडतो आहे कर्तव्य त्याचे.
आजही काही अनोखे नव्हते सोसायटी मध्ये एका पाठोपाठ एक असलेल्या त्या सहा खिडक्या बंद आहे,सातवी खिडकी मात्र अजूनही नेहमी प्रमाणे उघडीच आहे.ती अजुनही टेबल वर नाईटलेंपच्या उजेडात तिच्या छोट्याश्या लायब्ररीत वाचन करत बसली आहे, नेहमी येतो ती कधीपण वाचतच असते.खरच अनोळखी आहे ती पण तिच्या या रोजच्या सवयी मुळे पाऊले आपोआप तिला भेटण्या म्हणुन की काय कधी त्या ध्यासाने इकडे वळतात. ती केसांना सावरत अन् मधीच कॉफीचा एखादा किस घेत पूर्णपणे त्या पुस्तकात हरवून गेलेली असते दहा मिनिट, पंचवीस मिनिट, चाळीस मिनिट झाले मी तिला न्याहाळत आहे,ती अजुनही वाचतेय.कधीतरी म्हणजे एक सहा महिन्यां पूर्वी ऐकले होते मैत्रिणीकडून ती मानसशास्त्रचा अभ्यास करत असते,तेच काही तरी वाचत असावी बहुतेक,मग कुठे उमगले तिला या अभ्यासात इतकं का आवड असावी. पण कधी कधी तिच्यासाठी खंत ही वाटते की, तिच्या या वाचन प्रेमानं तिला कधी मानसिक दृष्ट्या तिच्या मनावर पुस्तकाने ताबा मिळवला अन् ती तशी वागली तर.पण मग नको असे विचार अन् मी तिथेच थांबतो,ती मात्र अजूनही वाचत असते अन् मग मनात ही येते. जसे मला लिहण्याच भान नसले की मला पण नाही कळत काळ,वेळ मी लिहत राहतो माझी लेखणी मला खुणावत राहते लिहत रहा लिहत रहा. असच काही तिचही असेल नाही का ? मी पण मनातच तिला म्हणतो वाचत रहा,वाचत रहा अन् एक गोड हसू चेहऱ्यावर आणत तिथून निघून जातो.
असे खूप मित्र मैत्रिणी आहेत जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आहोरात्र अभ्यास करत असतात.झोपेला मारत अन् स्वप्नांना जागवत ती जगत असता ती स्वप्न अन् माझा ही प्रवास संपतो, मी ही उलट्या दिशेनं जातो रात्र अन् थंडी आता मला भेटायला आली आहे.तिने मात्र आता झोपावे कारण रात्र खुप झाली आहे उद्याचा दिवस तिचाच आहे.....
#तीएकअनोळखीलायब्ररीतीलपुस्तकीवेडीअन्मीएकशहरहिंडणारा....
लेखन: भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र). औरंगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...