आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..!
आयुष्यात आयुष्याला घेऊन रिकामपण आलेली माणसं आपल्या आयुष्यातील आठवणींवर आपल्या दिवसातील २४ तासातील जवळ जवळ ७०% दिवस हा आपल्या भूतकाळातील आठवणींवर जगत असतो.उरलेल्या ३०% दिवस तो फार फारतर ५% झोप घेत असतो अन् उरलेल्या २५% दिवस मधील १५% दिवस तो उद्याचे आपले उज्ज्वल आयुष्य आणि सगळं सोईनुसार नाही झालेच तर ठोखरा खात आपण जगत असलेलं भविष्य काळातील आयुष्य डोळ्यांसमोर कल्पनेत बघत असतो.त्यात राहिलेला १०% असलेला दिवस हा फक्त वर्तमान काळातील आयुष्य फक्त तो जगत असतो.
त्यातही बराच वेळ तो फक्त अनेक गोष्टींशी,अनेक तर्क वितर्क लावण्यासाठी घालवत असतो...
हे असं आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात शक्यतो फारसे बदल होत नाही अन् झालेच तर ते खूप हळुवारप्रमाणे होतात.इतके हळुवार की त्याला सुद्धा या भविष्यातील येणाऱ्या सुखाची चाहूल होत नसते.या सुखासाठी सुद्धा त्याला आपण भोगत असलेले एकाकीपण अन् आपलं हे हळुवार आयुष्य योग्य अन् कारणी लागत आहे असं वाटत असते..!
या माणसांना शक्यतो कुणाचा सहवास नकोसा वाटतो,अंधार हवाहवासा वाटतो.पहाटेचा सूर्योदय कधीतरी यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी असा वाटणारा असतो.परंतु जसं जसं दिवस दुपार होवून मावळतीकडे जातो तसतसे त्यांना वरील टक्क्यांचा त्यांचा दिवस अन् त्यांचे हे आयुष्य अश्यावेळी अनुभवयाला येते...
त्यांना सायंकाळ हवीहवीशी वाटते,संध्याकाळी त्यांना आपल्या सहवासात कुणी आपल्या जवळची,आपल्याला समजून घेणारी व्यक्ती अन् तिचा सहवास हवहवासा वाटतो.त्यांच्या आयुष्यात आलेलं एकाकीपण अन् आयुष्यातील आलेलं नैराश्य,वर्तमान काळातील डोळ्यांना दिसणारी अवस्था बघितली की त्यांना पुन्हा काहीही नको वाटते अन् मग ते एकाकी निसर्गाच्या सान्निध्यात जावून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला,खडकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला अन् वेळोवेळी दूरवरून आपण आलेल्या वाटेवर चालणाऱ्या नॉर्मल व्यक्तींना बघत बसलेले असतात..!
मग पुन्हा त्यांच्याशी त्यांचं आपल्याला जुळवून बघणं होतं.अश्यावेळी आपण आयुष्याच्या या टप्प्यावर काय मिळवलं आहे अन् भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याची जुळवाजुळव होवू लागते मग ती त्यांच्या स्वतःशीच..!
मग पुन्हा शून्यात बघत एकटक विचार करत राहते ती व्यक्ती अश्यावेळी जगण्यात आलेलं रिकामपण,आयुष्याला घेऊन केला जाणारा विचार यामुळे तो अजूनच एकाकी होत जातो अन् पुन्हा त्याला कुणीही नकोसे वाटते,कुणाचाही सहवास नकोसा वाटतो..!
त्यांना वेळोवेळी समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असली की मग ते फक्त त्या व्यक्तीसाठी अन् तिच्या उज्वल भविष्यासाठी विचार करत असतात.अशी ही माणसे विचारांनी फार हळवी झालेली असतात,कुणाचे दुःख त्यांना बघितले जात नाही अन् ते बघण्यात आलेच तर त्याच्याशी ते आपल्या आयुष्यातील वर्तमान काळाला जोडून बघत असतात..!
अश्या व्यक्तींच्या दिवसातील झोपेचे ५% हे प्रत्यक्ष न अनुभवता कळत नाही,कारण त्यांची झोपसद्धा विचारांच्या गर्तेत अन् त्याच स्वप्नांचा पाठलाग करत जात असते ज्यात भविष्यातील उज्ज्वल काळासाठी काही प्लॅनिंग रचलले असतात..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा