मुख्य सामग्रीवर वगळा

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय डिफेन्स क्षेत्रात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करण्यात आला जो निर्णय अत्यंत धक्कादायक असा आहे..!

वरवर जरी हे सर्व खूप सहज अन् सोप्पं वाटणारं असले,तरीही भविष्याचा विचार केला असता ही योजना कितपत काम करेल हा प्रश्न आहे..!

तर चला जाणून घेऊया भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रकारात भरतीसाठी जो नवीन मार्ग अवलंबिला गेला त्या "अग्निपथ" या नवीन योजनेबद्दल..!

काय आहे अग्निपथ योजना..?
भारत सरकारने नवीन भरती प्रक्रिया अग्निपथची घोषणा दोन तीन दिवसांपूर्वी केली.या भरती प्रक्रियेतून जे सैनिक तयार होतील त्यांना अग्निवीर म्हंटल्या जाईल..!

"अग्निपथ" माध्यमातून पुढील काही वर्षात होणारी सैन्य दलातील भरती.

IndianArmy - 40000-45000-50000.
Indian Air Force - 3500-4400-5300.
Indian Navy - 3000-3000-3000.

अग्निवीरची पहिली बॅच पुढील 90 दिवसांत सुरू होईल अन् ही पहिली बॅच 2023 मध्ये येईल.
शिपाई,एअरमन,सेलर्स या पदासाठी अग्निपथ माध्यमातून भरती होत राहील.ज्यामधे वयोमर्यादा ही  कमीत कमी 17 वर्ष ते जास्तीत जास्त 21 वर्ष असेल.भरतीसाठी लागू असलेले नियम तेच असेल जे नेहमीच्या भरतीसाठी असतात.भरती प्रक्रियेतून निवड ही मेरिट लिस्टनुसारच असेल..!

भरती झाल्यावर ट्रेनिंग ही दहा आठवडे ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत असेल.ट्रेनिंग पिरियड मिळून संपूर्ण सर्व्हिस ही चार वर्षांची असेल.ज्यामधे वार्षिक वेतन हे 4.76 लाख ते 6.92 लाखपर्यंत चार वर्ष वाढत राहिल.

चार वर्षानंतर अग्नीवीर रेगुलर कॅडरसाठी आवेदन अर्ज करू शकतात,ज्यामध्ये योग्यतेनुसार 25% अग्नीवीरांना पर्मनंट केले जाईल.चार वर्षानंतर पेन्शन नसेल,सेवनिधी रुपात महिन्याची 30 % सॅलरी कापली जाईल.जीचा परतावा तुम्हाला चार वर्षानंतर व्याजासहित जवळजवळ 10.04 लाख रुपये मिळतील..!

सर्व्हिस दरम्यान सर्व सैनिकांचे 48 लाख रुपयांचे नॉन प्रीमियम इन्शुरनस असेल.सर्व्हिस दरम्यान शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 44 लाख रुपये मिळतील.अपंगत्व आल्यास 100% अक्षमता असल्यास 44 लाख,75% असल्यास 25 लाख,50% असल्यास 15 लाख इतकी रक्कम मिळतील..!

हे झाले या योजनेचे स्वरूप,परंतु 21 वर्षानंतर संपूर्ण सर्व्हिस करून जो मोठ्या प्रमाणात युवा वर्ग बाहेर पडेल त्यांच्या भविष्याचे काय..? अन् ही योजना समजून घेतली तर किती तरुण भारतीय सैन्य दलात जाण्यास इच्छूक असेल..? असे अनेक प्रश्न आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...