नजर मी रोखुनी नभाशी,
खेळ मी केला नयनांशी
करार त्यांचा झाला बघण्याशी,
हरल्या अपेक्षासाठी निमित्त ते ठरले अंधारल्या भूतकाळाशी..!
नयनांनी नजरेत रोज सजावी पहाट अशी,
खेळ मी केला बघण्याचा बुबळांशी
जीवन माझे अव्यक्त पर्याय न उरला जगण्याशी,
ढळावी रोज सांज नभा आड गेल्या त्या शिखराशी..!
शोधला पर्याय केला खेळ तो आयुष्याशी,
फासे फिरले अन् सोंगटी ने विश्वासघात केला पटाशी
जुळून यावे आयुष्य केल्या कराराशी,
पुन्हा खेळ न व्हावा अन् न व्हावा फसवाफसवीचा करार नियतीशी..!
नजर होते बोलकी संवाद व्यक्त न होणाऱ्या डोळ्याशी,
रोज नव्याने सजली जावी चादर खेळ तो रोज व्हावा
थडग्याशी..!
अन् मग,
व्हावा पुन्हा एकदा करार तो
वाहणाऱ्या आसवांचा कोरड्या झालेल्या डोळ्यांशी,
अन् अन्
वाहन्या गुलाब तो रोजच चादरीवर त्या कबरीशी..!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा