लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!
रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या तश्या वर्षानुवर्ष चालत आलेले रूढी,रिती,रिवाज,परंपरा यांच्यातही बदल होत गेले किंवा ते करावे लागले.काहींनी बदल स्वीकारून नवीन पिढीला नवीन अंदाजाचे व्यक्त होणं,सादरीकरण दिलं तर सोबतच काही परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या...
यात वेगळं विशेष असं काही झालं नाही पण येणारी नवी पिढी या सर्व गोष्टींना मुकली,अनेकांचा वडीलोपार्जित व्यवसाय पिढ्यानपिढ्याचा रोजगार बुडाला,अनेकांनी रोजगार निर्मितीची नवी साधने शोधली पण पिढीजात चालत असलेल्या वारसारुपी व्यवसायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी कला काळानुसार होणा-या बदलांमुळे कायमची लोप पावली तिचं काय..?
तर बदलणाय्रा रूढी,रिती,रिवाज,परंपरा या विषयावर लिहण्याचा प्रयत्न करत आहे...
जागरण,गोंधळ,पोवाडा या कलांतून उपस्थित समुदायात कलाकाराने आपली कला सादरीकरण करणे हे काळाच्या ओघात लुप्त होताना अलीकडे भासू लागले,दिसु लागले आहे.समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी बऱ्यापैकी जागरण,गोंधळ,पोवाडा या कला,थोडक्यात उत्सवाला अनुभवले आहे,केव्हा याच पिढीने जागरण,गोंधळ,पोवाड्यास नवीन पिढीजात कलाकारही दिले होते...
या पिढीत अपेक्षित कलाकारांची निर्मिती झाली अन् त्यामुळेच आता सध्या तारुण्यात पदार्पण केलेली आपली ही पिढी या कलांना बघु शकली,अनुभवू शकली.परंतु आपल्या पिढीने या आपल्या पिढीदर पिढी चालत आलेल्या संस्कृतीला,कलेला,कुठेतरी नाकारले अन् त्यामुळे या गोष्टी, पिढीजात भेटणार्या विविध कला प्रकार काळाच्या ओघात नष्ट होतांना दिसु लागले...
अजुनही मोठ्या प्रमाणात जागरण,गोंधळ,पोवाडा यांचे सादरीकरण संपुर्ण महाराष्ट्रभर होत असते,पण याला बघण्या हेतू असो किंवा त्या कलेला आपल्या पुढील पिढीसाठी देण्यासाठी ती अवगत (शिकणे) करणे असो यासाठी होणारे प्रयत्न खूप कमी होताना दिसतात.यालाही भर म्हणावी की काय लॉकडाऊनचा काळ अन् मग अनुभवयाला आलेलं सर्व क्षेत्रातील कलाकारांचे जीवन,खूप वाईट परिस्थिती अनुभवयाला आलेली...
एक भीती सतत वाटत असते की,या कला काळाच्या ओघात म्हणजे पुढील वीस पंचवीस वर्षांत संपुष्टात येतात की काय...
मग या सोबतीने पडणारे प्रश्न नेहमीसारखेच असेल जसे आपण आपल्या वाड-वडिलांना,ज्येष्ठ व्यक्तींना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या विविध कला,त्यांचं सादरीकरण असो त्यांच्या माध्यमातून ज्ञात होणारे समाजाला ज्ञान असो अन् मग त्या कला नष्ट झाल्यामुळे आपण ते सर्व बघु शकलो नाही अनुभवु शकलो नाही.
त्यामुळं आपल्याला पडलेले असंख्य प्रश्न त्या विविध कलांचे सादरीकरण कसे असते..?
हेतू काय असतो..?
असे अन् अनेक प्रश्न पडुन लागतात मग याला आपण फक्त चित्रात अनुभवू शकत होतो एकतर,नाहीतर फक्त कल्पनेत पण प्रत्यक्षात आपण या सर्व गोष्टींना,कलांना अनुभवू शकत नव्हतो हे खरंखुरं वास्तव मग सामोरे येऊ बघते अन् मग काळाच्या ओघात लुप्त चाललेल्या या कला, साहित्याला कुठेतरी जपायला हवं ही अनुभुती येऊ बघते....
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा