मनाचे स्थित्यंतर..!
सकाळचं उठणे अंगावर लेवून बळजबरीचं जागं होवुन कितीवेळ स्वतःला ब्लॅंकेटच्या आत गुंडाळून परत झोप घेणं होते,दुपारचे सुर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदानातून आत येत चेहऱ्यावर येऊ बघतात अन् मग अंथरुणातून डोळे चोळत स्वतःला सावरत,अंथरुणाला सावरत उठणे होते...
मग कितीवेळ विंडोग्रीलच्या बाहेर असलेल्या जगाला न्याहाळत बसणे होते अन् आपल्या घराच्या आतल्या जगाशी तुलणाही,मग मनाचे असंख्य गोष्टींशी जुळवुन येणारं आपलेपण.चुकलेल्या अंदाजाला खरे ठरवत मनाशी आशेची रुंजी घालू बघणे अन् पुन्हा एकदा स्थित्यंतर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ उलगडुन आयुष्यात त्याचा वाक्यात उपयोग करून घेणे...
स्थित्यंतर,स्थित्यंतर या शब्दाशी फिरणारे मनाचे खेळ न पलटनारे,न पडणार्या सापशिडीचा खेळातील फाश्याप्रमाणे ठरत राहते...
मग मनचेच स्वतःला कधीतरी आसमंतात पाहणे होते तर कधी शून्याच्या गर्तेत वाहून जाताना स्वतःला बघत राहणे,मनाशी नेहमीची विचार करण्याची सवय अन् मग नकळत ते सत्यात उतरण्यासाठी मनाशीच चाललेला शरीराचा स्वतःशी संवाद आपण मनाच्या एका लहरीपणाला किती भुललो आहे हे कळूनही ते स्वीकारणे भाग पाडले जाते...
वेळेच्या बाबतीत जगत्याला जिवंत ठेवण्यासाठी मनाचा आधार होतो तो मग असा ज्यात कुठलेही तथ्य नसल्याचे क्षणाक्षणाला कळत राहणे.पण ते कोडे उलगडले असुनही चेहऱ्यावर न उलगडण्याचा खोटा आव आणुन स्वतःला मिरवत राहणे,म्हणजे काय तर मनाच्या एका लहरीपणाला बळी पडून स्वतःची फसवणुक करणे होय...
Written by,
Bharat Sonwane ...
अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाThanks you mam
हटवा