मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी भाषा दिवस...

#मराठी_भाषा_दिवस...
#एका_भाषेचा_मृत्यु...

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा..!
मराठी भाषा दिनानिमित्त आज अनेक लेख,कविता मराठी भाषेच्या सन्मानार्थ लिहल्या जावू लागले आहे.अनेक लेख वाचनातही येऊ लागले आहे पण...
सर्व आजच्या दिवसासाठीच का..?
                                            मराठी भाषा जगली जावी,रुजली जावी, सर्वदूर जगतात तिचा प्रचार व्हावा,प्रसार व्हावा यासाठी कुठवर प्रयत्न आपण करत आहोत..? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकवेळा हालचाली करूनही किंवा काही अंशी तो दर्जा मिळवूनही मराठी भाषेला जागतिक स्तरावर का म्हणुन दुय्यम स्थान दिलं जातं..? विविध प्रकारच्या सोशल मीडियाच्या जगभराच्या प्लॅटफॉर्मवर का मराठीस टाळले जाते..?

असे अन् अनेक प्रश्न मराठी भाषेचा विचार करतांना पडत असतात,जगाच्या पाठीवर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषेचा जगात पंधरावा क्रमांक लागतो तरीही वरील प्रश्न आपल्याला का पडावे..?

याला नाही उत्तर देऊ शकत आपण कारण हेच की,काही दिवसांपूर्वी एका "ईयाक" या नावाच्या भाषेचा मृत्यू झाला.म्हणजेच तीचं अस्तित्व या जगातून समुळ पूर्णपणे नष्ट झाले.हिच अवस्था काही दशकांनी असो किंवा शतकांनी असो मराठी भाषेची झाली तर काय..? यापूर्वी या विषयवार बरेचसे लेखन केले आहे,परंतु जेव्हा-जेव्हा मराठी भाषेचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा विषय येतो तेव्हा हि भाषा रुजली,जगली जावी मग यासाठी कितीही लेखन केलेले कमीच असेल...

एक भाषा संपणे जगाच्या पाठीवर झालेली ही एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा आज घडीला बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती यांचे जतन विश्वात केले जातात.म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज यातील अनेक भाषा कायमच्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे...काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये.कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये....

एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी,रीतिरिवाज,संस्कार,जे फक्त त्या भाषेतच उपलब्ध होते,ते देण्यापासून कायमचेच वंचित होतो....

पुन्हा एकदा जर तेवीसशे भाषांचा विचार केला,अभ्यास केला तर हे खूप मोठे शब्द भांडार आहे,त्याचा विचार करणे हे तंत्रज्ञानाच्या या युगाच्याही खूप पुढे आहे...विविध देशात तर ती भाषा संपुष्टात येणार आहे म्हणुन ती फायद्याची नाही,म्हणून तिच्यावरचा होणारा अभ्यास ही थांबवला आहे....

हे किती वाईट अन् भयावह आहे,कारण एक भाषा संपणार म्हणजे त्या भाषेत केलेले संस्कृतीचे निसर्गाचे,मानवी जीवन,जतन,लिप्या,वेशभूषा,पाककला
हे संपून जाईल.जेव्हा एक भाषा इतक्या सहज संपुष्टात येते,तिच्यासोबत आपण खूप काही विसरून जातो कींवा ते आपल्याला विसरण्याला भाग पडते.हजारो वर्षांच्या जगण्याचा सांस्कृतिक,भौगोलिक,मानवी उत्क्रांतीचा यावर त्या भाषेत झालेलं लिखाण नाहीये यांमुळे हे सर्व त्यांच रोजच्या जीवनात जगण्याची विशिष्ट पद्धत,दस्तावेज यामुळे जिवंत असेल.परंतु जेव्हा या भाषेतील त्या शेवटच्या व्यक्तीचा मृत्यु होतो त्या वेळी भाषेसंबंधीचे शब्दांमध्ये दडलेले वेगवेगळे संकेतक मरत असेल कायमसाठी त्या व्यक्ती सोबतीनेच....

पुढे जाऊन फक्त आपल्याच देशाचा विचार कधी केलाततर,आपला देश ओळखल्या जातो तो विविध भाषा,संस्कृती,वेशभूषा,वेद,पोथी,पुराण,विविध धर्मग्रंथ,जगण्याच्या वेग वेगळ्या पद्धती,राहणीमान,पाककला,सण,वार,शिक्षण यांमुळेच.आपल्या देशातही अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे,परंतु या भाषांवरही अजूनही कुठला अभ्यास,लिखित स्वरुपात केलेला अनुवाद,लेखन भेटत नाही ही शोकांतिका आहे...

भारत या देशाला सर्वदूर ओळख दिली जाते याचे एक महत्त्वाचे कारण भारतात असलेली भाषा संस्कृती....
मानाने सर्वदूर सर्वाधिक जुन्या भाषा म्हणून आपण ज्या भाषांना मिरवतो त्या "संस्कृत" "उर्दू" या भाषा कदाचित पुढील काही दशकात नामशेष होईल याची भीती वेळोवेळी वाटत आहे...
कारण अलीकडेच्या काळात या भाषांबद्दल न झालेला अभ्यास....

नव्या पिढीला अजूनही बऱ्यापैकी या भाषा शाळेत उपलब्ध नाही,अजूनही त्या कोणाला येत नाही.या भाषा संपल्या तर किती मोठा इतिहास,माहिती,संस्कृती,साहित्य हे कायमसाठी संपुष्टात येईल.या भाषांवर बऱ्यापैकी (अल्प प्रमाणात) लेखन झाले आहे.परंतु त्याचे जतन,संवर्धन करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत असेही वाटून जाते....

हे फक्त या भाषांसाठी किंवा मराठी भाषेसाठी नाहीतर भारतात,नव्हे तर जगातील अश्या अनेक भाषांसाठी आहे,तेव्हा एक भाषा संपणे हे खूप वाईट गोष्ट आहे,हे नुकसान कधीही न भरून निघण्यास सारखे आहे.एका भाषेचं असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये इतकंच वाटते कारण यामुळे एका भाषाला,संस्कृतीला आपली पुढची पिढी कायमची मुकलेली असेल जे नको वाटते...

तेव्हा मराठी भाषा रुजली जावी,जगली जावी,सर्वात महत्त्वाचे ती लिहली जावी अन् जगाच्या पाठीवर कुठेही ती सन्मानाने बोलली जावी...

(हाच आग्रह जगाच्या पाठीवर बोललेल्या जाणारया तेवीसशे भाषांसाठी असेल कारण,कुठल्याही भाषेचा असा मृत्यु होणं,ती संपुष्टात येणं हे खुप दुःखद आहे)

-भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...