What's on your mind..?
तुझ्या रोज विचारल्या जाणाऱ्या...
What's on your mind..? या प्रश्नाला अलीकडे फार काही वेगळी उत्तरे नसतात रे,म्हणून हल्ली टाळत असतो इथे रोज तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला,पण लिहत्या हाताला हे फार वेळ नाही जमत रे. मग कधीतरी असे काहीतरी लिहून मोकळं होवुन जातो की माझेही कुणी फार सोवळे गावू नये किंवा माझ्या लिखाणाचेही...
तुझ्या What's on your mind..? या प्रश्नाला उत्तर द्यायचे ठरवले की,अलिकडच्या काळात पहील्या एका वाक्यासाठी पंधरा मिनटे मी विचार करत असतो की काय उत्तर द्यावं..?
काय लिहावं..?
कारण ते ही कुणीतरी वाचणार असतेचना.
बऱ्याच वेळा काहीतरी लिहून पोस्ट करण्यापूर्वीच Discard करतो,परंतु तेच लिहलेल कॉपी करून ठेवायला मात्र कधीच विसरत नाही.कारण मनाच्या झालेल्या द्विधा मनःस्थितीत मग लिहलेलेच मला मार्ग दाखवू लागते अन् मनचेच मनाचे बोल खरे वाटू लागतात...
कधीतर मग फक्त मनाचेच समाधान म्हणून जे लिहलंय ते स्वीकारणं येतं मग ते,साफ चुकीचं का असेना...
मनाचे डोहाळे पुरवायचे म्हंटले की काय चूक अन् काय बरोबर हा विचार येतच नाही रे,अधुन मधून तुझ्या या प्रश्नाला उत्तर देतो.वाचणारे वाचक वाचत राहतात,प्रतिक्रिया देत राहतात मग कुठेतरी जरावेळ बरे वाटते...
मग काही तासांनी पुन्हा तोच प्रश्न नाही जमत रे उत्तर द्यायला पुन्हा पुन्हा...
थोडक्यात या अवस्थेला (It's called,)
Schrödinger's Smiley :): असे म्हणतात...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा