मुख्य सामग्रीवर वगळा

बोले ईतिहास मराठीचा..!

कवितेचे शीर्षक- बोले ईतिहास मराठीचा..!

जात,धर्म या रीतिरिवाजा खाली भाषा माझी रोजची पिढली जात आहे..!
नीच प्रवृत्तीच्या पिढी दर पिढी चालत असलेल्या प्रथाना,
भविष्यात जगवते ठेवण्यासाठी श्वास माझ्या मराठीचा प्रत्येकदा नव्याने तो दाबला जात आहे!!१!!

माझ्या मराठीचे मी काय सांगावी सांगू कौतुके,
जे माझ्या माय माऊलीच्या भाळी असलेल्या चंद्र
कोरीवर कोरले आहे..!
महतीच काय सांगावी माझ्या मराठीची,
जेव्हा तान्हुल्या बाळासाठी हिरकणी बुरूज सांजेला 
माझी माय उतरत आहे,इथेही माय मराठी माझी 
संस्कृतीला जागत आहे!!२!!

अफसोस कधी न आम्हाला संस्कार जिजाऊचे 
अन् राजे मराठीत गड किल्ल्यांचा ईतिहास सोनेरी 
पानावर साकारत आहे,
ईतिहास साक्षी आमुचा गरज आता मान मिळवा मराठीस आमुच्या आता,
दिल्लीच्या तख्तावर मराठी वदली जावी पुन्हा एकदा आता!!३!!

कौतुक होते चराचरामध्ये मराठीचे आमुच्या,
दुर्दैव हेच आमुचे की पुन्हा एकदा मराठीस जगण्या हात 
पसरावे आम्हा लागते आता...
असो तरीही खंत ना आम्हा आता ईतिहास जेव्हा उलगडतो आमुचा,
भविष्यास पुरून उरेल हे स्फुरण देते मराठी माझी आता!!४!!

आपलेच ते परके झाले हा ईतिहासच आपुला,मराठीस फक्त राजभाषेचे डोहळेच तुम्ही ते दावले..!
परि अफसोस ना आम्हा आता,
ईतिहास मराठीचा सांगतो आमुचा फितुरांना धडे देण्यास मराठीने शिकवले आम्हा आता!!५!!

झुकली न कधी झुकणार मराठी आता सोवळे उद्याचे पाहण्या मराठी भाषा आमुची आतुर आता...
मागणार नाही तुम्हीच द्याल राजभाषेचा मान मराठीस माझ्या आता!!६!!

लिखित:कवी.भरत लक्ष्मन सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...