After Morning..!
सकाळ सरल्या दुपार ढळावी अन् मग दुपारच्या उदासवाण्या वेळेनं मनावर असंख्य न घडणाऱ्या गोष्टींनी ताबा घ्यावा,अस्वस्थाच्या जाणीवा मग घटके घटकेला मनाशी घडत रहाव्या.तरीही काही घडतच नाहीये,असा खोटा आव चेहऱ्यावर आणुन बदल स्वीकारत दाराच्या उंबरठ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ईस्मास न्याहाळत राहावं...
येणारा कोण,कुठला,काय करतो,अनोळखी आहे का..?
अश्या गोष्टींची मनाशी मनाची समजूत घालुन उत्तरे शोधत रहायची,मनाला क्षणिक समाधान म्हणून ती उत्तरे योग्यच असावी.जरी गेला काही काळ आसपास काही घडत नाहीये तरी मनाला क्षणभर विचारांतून सुटका मिळावी म्हणुन ही खरीखुरी उत्तरे अन् मनाचा समतोल राखून ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा पर्याय...
तरुणपणात सुकलेल्या डोळ्यांच्या कडांना आसवांचा थंडावा अनुभवयाला म्हणुन उंबरठ्यावर बसून सैरावरा वाऱ्यासारख्या भटकणाऱ्या मनाच्या गुजगोष्टी,मनाने डोळ्यांना सांगाव्या अन् मग नकळत डोळ्यांनी आपलं इतक्या वेळ सावरणं अवघडून आसवांना मोकळ्या वाटा करून द्याव्यात...
क्षणाच सुख काय ते अनुभवयाला यावं अन् नकळत मग ...........
स्थित्यंतर या शब्दावर मग भरोसा बसावा कारण,हे आजवर अनुभवलं नसणे अन् एकाकी ते अनुभवयाला येणं खूप वाईट्ट आहे.एकांताला सोबतीला घेऊन मग मनाने आशेच्या हिंदोळे घेत खूप खूप दूरवर भटकुन येणं,जिथवर फक्त खोटा आभास सोबतीला बुडत्याला काडीचा आधार ठरावा...
आहे त्या गोष्टीला स्वीकारणं मनाला नकोसे वाटते कारण त्याला ते सवयीचं नाही,त्याला नेहमीच क्षितिजा पल्याडचं अनुभवयला आवडतं म्हणुन का कुणास ठावूक हे अंगवळणी पडणे काही दिवस अवघड आहे....
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा