#Aurangabad...
एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल सिटी मिळालेली नवी ओळख...
झालेला उपलब्ध रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना हे सर्व औरंगाबाद शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील शहर आहे दाखवून देत आहे...
औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे.इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,३०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो असा अंदाज प्राथमिक माहितीनुसार देता येतो,या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत शहर मोठी झेप घेऊ बघत आहे.
नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे,अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,शहराची वाढती आर्थिक उलाढाल बघता शहराच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे.एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...
एकीकडे शहराचा वरील कारणांमुळे झालेला विकास अन् COVID-19 मुळे औद्योगिक विश्वात बदलु बघणाऱ्या संकल्पना कुठेतरी काळजीचे कारण ठरत आहे.परंतु सध्य परीस्थितीचा विचार केला असता बदललेले समीकरणे योग्य वाटत आहे.
COVID-19 च्या भयावह परिस्थितीमध्ये औद्योगिक वसाहतीत नियमांमध्ये केलेले बदल हे पूर्णपणे योग्य ठरले अन् त्याचे रिझल्ट म्हणुन काही अंशी का होईना पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेली औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामधील कामे असो किंवा शहरातील छोटे-छोटे व्यवसाय पुन्हा एकदा उभे राहण्याचा करू लागलेले प्रयत्न...
अजुनही पूर्णपणे धोका टळला नसल्यामुळे नियमांशी बांधील राहून शहरातील सर्व व्यवसाय,कंपन्या आपापली कामे करू बघत आहे.मागील तीन-चार महिन्यांचे औद्योगिक वसाहतीतील कामे अन् त्यांच्या कामे करण्याच्या पद्धती जर बघितल्या तर यात हळूहळू पुन्हा सर्व पूर्वपदावर येताना दिसत आहे,काही महिन्यांपूर्वी कंपन्यामध्ये बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये चालू असलेले कामे हळूहळू आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये बदलवण्याचे काम कंपन्या करत आहे...
यामुळे शहरातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येवर कुठेतरी मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे,सोबतच काही अंशी का होईना काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी बघण्यासारखे आहे...
एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटो मोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी अन् एकीकडे शहरात नव्याने बाळस धरू बघणारे आय टी क्षेत्र नव्या नियमांना,संकल्पनांना लक्षात घेऊन आपले पाय रोवू बघत आहे...
यामुळे बऱ्यापैकी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी हे क्षेत्र उपलब्ध करून देत आहे,अजून बराच कालावधी यासाठी आय टी क्षेत्रातील कंपन्यांना या शहरासाठी द्यावा लागेल तेव्हा कुठे या ठिकाणी हे क्षेत्र भरभराटीस येऊ शकेल...
COVID-19 च्या अतिशय कसोटीच्या काळात ज्याप्रमाणे औद्योगिक विश्वात काही बदल झाले,तसेच आय टी विश्वातही काही बदल झालेत.ज्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे,त्यामुळेच 'Work from Home' या पूर्वापार चालत असलेल्या संकल्पनेला स्वीकारत काम करण्याचे ठरवले गेल्या मुळे हे खरच सत्यात असू शकते हे दिसून आले आहे.ज्याचा की खुप मोठ्या प्रमाणावर फायदा आय टी क्षेत्रातील कंपन्यांना होताना दिसून येत आहे...
औरंगाबाद शहर आणि आय टी क्षेत्र लवकरच पुढील भागात...
Written by,
©®Bharat Sonwane.
MBA-(Production & Operation Management).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा