मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Vibes..!

Morning Vibes..!


Morning Time उठल्यावर बेडवरील ब्लँकेटची घडी घालतांना विस्कटलेल्या आयुष्याची रोज नव्याने ब्लँकेटच्या घडीप्रमाणे तीच आयुष्याची विस्कटलेली घडी बदलता येईल का..? 
                                                               हा रोजचा विचार,प्रश्न मनात येऊन जातो,अलिकडच्या काही दिवसांतील मनाची मिळणारी उत्तरे फक्त "नाही" या एकाच शब्दात थोडक्या स्वरूपात मला भेटत असतात...
घडी घातलेलं ब्लँकेट ठरलेल्या जागेवर ठेवून देणं होतं,नाहीतर मग पुन्हा आयुष्यात आलेल्या रिकामपणात एक प्रहर साखर झोप होते...

पुन्हा मग तोच क्रम तीच विस्कटलेली ब्लँकेटची घडी सावरायची,करायची,ठेवून द्यायची.
बेडवरील सांजेच्या प्रहरी व्यवस्थित अंथरूण ठेवलेलं बेडशीट कव्हर पूर्णपणे सकाळी उठल्यावर पुन्हा अस्तव्यस्त झालेलं बघून काहीवेळ आपल्याच झोपण्याचं हसु चेहऱ्यावर फुलून येणं अन् मग गालातल्या गालात आलेलं ते हसू ...

मग तेच बेडशीट कव्हर बेडवर टाकायची कसरत ज्याप्रमाणे Daily Routine मध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारी कसरत या गोष्टींचा दिवसभराचा आलेख डोळ्यासमोर येऊन जात असतो.कित्येक वेळा बेडवर बेडशीट कव्हर व्यवस्थित टाकायचं,चहुकडून त्याला व्यवस्थित फोल्ड करून पुन्हा ते दिवसभर बेडवर व्यवस्थित राहील याचीच मनाला खोटी शाश्वती देत राहायचं....

आयुष्यात आलेल्या रिकामपणात माणूस अती विचार करू लागतो हे मग दिवसभर वेळोवेळी कळून चुकत असते,मग बारीक सारीक गोष्टीत स्वताला गुंतवून घेणं होत राहतं तर कधी नको त्या गोष्टीत रमवून घेणंही होतं...

जसा सूर्योदय होतो तसाच नेहमीप्रमाणे सूर्यास्त होतो,या इतक्या वेळात आयुष्याची विस्कटलेली घडी कितीवेळा काट्याच्या घडीवर बरोबर येते अन् कितीवेळा बिघडते याला उत्तर नसते.त्या एका लिमिटपर्यंत मग स्वताला सावरणे येतं,स्वतःची मनाची खोटी समज काढणे येतं अन् माणूस कितीत सहनशील असतो हे ही कळायला लागतं...

सांज ढळली की मग पुन्हा पुस्तकाचा आधार घेऊन ब्लॅंकेटच्या घडीला सावरत त्यात रममाण होवुन जाणं येतं,मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते...
                                                              मिळालेली मनाची उत्तर यांचं पुन्हा रिव्हिजन होत राहते,मग डळत्या सूर्याला बघुन तासागणिक सावरलेली घडी विस्कटत जाते पुन्हा एकदा मनाचीही अन् ब्लॅंकेटचीही...

पुन्हा मग एकदा मग मनाला,स्वताला सावरायला जमायला हवं नाहीतर काळोखात आसवांना टिपणार कुणी नसतं,मग क्षणा क्षणाला विचारांचे स्मरण आणि मनाशीच दाबलेले आजवर सावरलेले हुंदके फुटत जातात अन् सावरणे कठीण होवुन बसते...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...