Life with THE STARRY NIGHT..!
माझ्या आयुष्यात मला काळोख ओळखीचा झाला आहे,व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या "The Starry Night" या सुंदर काळोखाशी भाष्य करणाऱ्या चित्राशी मी संवाद साधायचो अन् काळोखातून त्या चित्राद्वारे मी माझ्या आयुष्यात असलेल्या कल्पनांना घेऊन मी ते चित्र बघत मी ते क्षण जगायचो..!
मी नेहमीच म्हणतो की,आयुष्य सुखी जगण्याचं सूत्र खूप सोप्पं अन् खूप सहज उलगडणारे आहे.हो फक्त त्यासाठी आपल्याला त्या पैक व्हावं लागतं,त्या पैक व्हावं लागतं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला आनंद शोधायला शिकायचं,छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकायचं..!
तर "The Starry Night" हे काळोखाशी भाष्य करणारं चित्रं अन् त्याला जोडून माझ्या आयुष्याशी असलेल्या जुजबी आवडी मिळून मी माझं आयुष्य जगत आहे,एरवी अलिकडच्या काही वर्षात आयुष्यात काळोख दाटला आहे.आयुष्याची गणितं कित्येकदा चुकून पुन्हा एकदा बरोबर येण्याच्या मार्गावर येऊन मला हुलकावणी देऊन जात आहेत..!
हुलकावणी म्हणजे माझ्या आयुष्यात सुद्धा काही गोष्टी ठरवून मी त्या होईल या विचाराने जगत असतो,फक्त त्या माफक अन् शुल्लक अपेक्षा आहे,ज्या खूप सहज पूर्ण होतील किंवा खूप अश्या मोठ्या नाहीत.परंतु अलीकडे या सर्व छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा माझं सुख शोधत असताना माझी बरीच आयुष्याला घेऊन तडजोड होत असते अन् त्यामुळे,
"The Starry Night" या सुंदर चित्रात शून्यात हरवलेला मी मलाच शोधू लागतो..!
आयुष्याला घेऊन आपण काही नियोजन करून आयुष्य जगत असू तर मला तरी वाटते आपली अवस्था ही "The Starry Night" प्रमाणेच आयुष्यात असो किंवा त्या चित्रात कुठलाही ताळमेळ नसल्याप्रमाणे मला भासते.एकतर आयुष्यात "संदर्भ लावण्यात" असो किंवा "जरतर" या दोन गोष्टीमध्ये आपण आयुष्याचा बराच वेळ खर्ची करतो..!
आणि आयुष्यात काही गोष्टींचा संदर्भ लावण्यात आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा ऐन उमेदीची काही वर्ष खर्ची करून टाकतो.मग आपलं आयुष्य "The Starry Night" या चित्राची न समजणारी दिशा जशी आहे त्याप्रमाणे मग आपल्याला आपले आयुष्य भासू लागते..!
मग आयुष्यात आलेला काळोख असो किंवा प्रकाश,अनवाणी पायांना भेटलेल्या अनोळखी वाटा हे सर्व या चित्राशी जुळून येतं..!
अन् मग मग पुन्हा शोध सुरू होतो हरवलेल्या वाटांचा,काळोखात हरवलेल्या प्रकाशाचा अन् आयुष्यातून हरवलेल्या रंगांचा..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा