आयुष्य_Cricket..!
माझ्या अस्वस्थतेच्या काळात काही सकाळ मला उगाच प्रसन्न वाटतात अन् दिवसाची झालेली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा आठवांचे दिवस घेऊन आठवणीला येतात.आज खूप दिवसांनी म्हणजे तब्बल काही वर्षांनी पहाटेच तालुक्याच्या क्रीडा संकुलाला भेट दिली अन् क्रिकेटसाठी असलेलं लहानपणीचे वेड त्यासाठी पहाटेच मित्रांसमवेत हातात बॅट,बॉल घेऊन क्रीडा संकुलाकडे होत असणाऱ्या धावा आठवल्या..!
लहानपणी करिअर म्हणून किंवा भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हे अनेकांना माहीत नसते,त्यातलाच मी एक मग अश्यावेळी जे आवडेल ते करायचं.त्यातच उत्तुंग यश संपादन करायचं अन् यशाच्या सर्वात उंचाच्या शिखरावर जाऊन बसायचं,मग त्यासाठी खूप मेहनत घ्यायची.हेच क्रिकेटच्या बाबतीत पण हे खूळ काही वर्षांसाठीच मनावर स्वार झालेलं,पुढे जसे प्रत्येक आवडीनिवडीला वेळ असताच पूर्णविराम दिला,त्यातील ही सुद्धा एक आवड अन्
भविष्यात काय करायचं..? या प्रश्नाला काही वर्षांसाठी मिळालेलं उत्तर होतं..!
आयुष्याला घेऊन लहानपणी आपण खूप विचार करत असतो,प्रत्येक नव्या गोष्टीत आपल्याला कुतूहल वाटत असते,त्या प्रत्येक गोष्टीचा खोलात जावून आपण विचार करत असतो.त्या गोष्टीला भूतकाळातील,वर्तमान काळातील संदर्भ जोडून उद्याच्या भविष्य काळासाठी आपण स्वप्न बघत असतो..!
म्हणूनच कदाचित म्हणत असतात,ऐन कळत्या वयात जेव्हा आपल्याला भविष्यात काय करायचं..? या प्रश्नासाठी मार्ग निवडलेले असले की आयुष्याला घेऊन होणारी तडजोड ही फार मोठ्या प्रमाणात जाणवत नाही अन् आपण यशस्वी होण्याकडे आपली वाटचाल करू लागतो..!
हे सगळं आठवायचे कारण हेच की,आज क्रीडा संकुलात उद्याच्या भविष्याला घेऊन आज म्हणजे वयाच्या साधारण पंधराव्या वर्षापासूनच त्या स्वप्नांना आकार देणारी ही लहान मुलं भेटली.त्यांचं आपल्या स्वप्नासाठी तयार होणं बघितलं तर नक्कीच वाटतं की भविष्यात अंतराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघात यापैकी एकतरी मुलगा आपलं प्रतिनिधित्व करेल..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा