बंदिस्त आयुष्याची कविता..!
स्वप्नांशीच मी बांधील राहिलो,
कल्पनेतले सत्यात ते कितपत उतरले स्वप्न,
कल्पनेतल्या स्वप्नांना सत्यात उत्रविण्या,
मग मी झुरतच राहिलो..!
बंदिस्त खोलीत मी माझ्याच राहिलो,
खोलीत उतरले ते कितपत किरणं,
कावड फटीतून येणाऱ्या आशेच्या तिरीपेस,
मग मात्र मी बघतच राहिलो..!
उन्हं कावडा पल्याडची अन्
सावलीस मी सहवत राहिलो,
कुणी वार केला मग कावडावर,
त्या भीतीनं मात्र मी कडी-कोंड्याच्या आत
मलाच मग बंदिस्त करत राहिलो..!
ठेचकाळल्या चौकटीवरील बिजागिरी जश्या,
असे वाटते की,
घाव माझ्यावरीच झाले ते दगडांचे,
अन् मग काय,
माझ्याच आयुष्याला घेऊन मीच मला,
बरबाद होतांना बघत राहिलो..!
रक्ताळलेल्या हातांकडे माझ्या मी बघत राहिलो,
हातांनी हातांशीच तो मागण्याचा करार केला,
जेव्हा वार झाले,तेव्हा सावरले किती,
तेव्हा हाताकडे बघुनच मग मी,
माझ्या आयुष्याचीच गोळा बेरीज करत राहिलो
अन् मग पुन्हा पुन्हा
उद्याच्या उज्वल भविष्यासाठी मी भिकच मागत राहिलो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा