मुख्य सामग्रीवर वगळा

गावरहाटी..!

गावरहाटी..!

नेहमीप्रमाणे खूप दिवसांनी पहाटेच्या गारव्यात बापाचं गाव जवळ करायचं,रोजची शहराची झालेली सवय आणि क्युबिकल्सच्या दूनियेपासून काही तासांची सुटका किंवा मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांना उत्तरे शोधायची आहे म्हणून मग बापाच्या गावाला जवळ करणं होतं..!

गावाला आलं की मनसोक्त भटकणं होतं,गावाची ओढ अलीकडे फारशी जाणवत नाही पण आठ-दहा दिवस झाले की शिवनामायची आठवण येते.तिच्या तिरावर असलेल्या हेमाडपंती संगमेश्र्वर बोलावतो आहे असे भास होतात.मग कधी एकदा जावून त्याच्या प्रांगणात मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवतो असे होते,कारण काही प्रश्नांची उत्तरे हेमाडपंती संगमेश्र्वराच्या प्रांगणात ध्यानस्थ बसले की मगच सुटतात..!

पहाटे आठच्या सुमाराला गावाला आलं की मग नदीच्या तीरावर चालत राहायचं,थंडीचे दिवस असल्यानं शिवनामायच्या वाहत्या पाण्यावर वाफ तरंगत असताना डोळ्यांना नजरी पडत आहे.रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्याने वाटेवर गुलमोहराच्या फुलांचा पडलेला सडा अन् डोईवर गुलमोहराचा मंडप,नदीच्या तीरावर बोडक्या झालेल्या बाभळी हिरवाईने नटलेल्या आहे,पिवळ्या फुलांचा होत असलेला डोईवर वर्षाव,रानमोगऱ्याचा वाटेनं येणार सुगंध अन् निवांत वाहणारे पाणी,जलक्रीडा करणारे बदके,बगळे बघत चालत राहायचं..!

हेमाडपंती संगमेश्र्वराचं देऊळ जवळ आलं की,नदीच्या थडीला बांधलेल्या पायऱ्यांवर बसून नदीत तळ पाय बुडवून न्याहाळत राहायचं.जोवर पहाटेची थंडी अंगातून जात नाही अन् कोवळे ऊन अंगावर येत नाही तोवर,टिपत राहायचं डोळ्यांनी शिवनामायच्या वाहत्या पाण्यातील हालचालींना,झाडांच्या सावल्याना,अंदाज बांधत रहायचे आयुष्याचे,संदर्भ जोडत रहायचे आयुष्याचे शिवनामायच्या संगतीने आपल्या आयुष्याचे..!

पहाटेचे कोवळे उन्ह अंगावर आले की वाहत्या पाण्यातून तळवे काढून मातीचा गारवा अनुभवायचा अन् शिवनामायला चंदनतिलक,कुंकम वाहून मनोभावे प्रार्थना करून हेमाडपंती संगमेश्र्वराच्या देऊळाची वाट जवळ करायची.आता पर्यंत बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतात,आयुष्याला घेऊन आपण किती विचार करतो अन् ते सर्वच किती गौण आहे हे इथे आलं की कळून चुकते..!
आपण आयुष्यभर अपेक्षेचे ओझे वाहत राहतो अन् एक दिवस शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात आपलीच राख करून वाहवून घेतो अन् मग एक वर्तुळ पूर्ण होतं ज्याच्या दिश्या हरवलेल्या असतात आयुष्याच्या उत्तरार्धातसुद्धा..!

मग हेमाडपंती संगमेश्र्वराचं देऊळ आलं की,मनोभावे संगमेश्र्वराच्या पिंडीशी आपण नतमस्तक व्हावं.गाभाऱ्यात तासनतास कुणी येत नसल्यानं इथे खूप सहज समाधी लागून जाते अन् मग काळोखात डोळ्यांना अजूनच काळोख जाणवतो,डोळे उघडे करून बघण्याचा प्रयत्न करूनही बराच वेळ उघडत नाही अन् मग कितीवेळ शांत चित्ताने बसून राहावं.आपल्या आयुष्यात काय चालू आहे,आपण का जगतो,काय करायचं आयुष्यात,भविष्याचे काय हे कुठलेही प्रश्न मग पडत नाही ध्यानस्थ बसून राहायचं फक्त..!

देवाचं माहित नाही पण इथली शांतता मनाला हवी असते म्हणून असं अधून मधून येणं होत असतं..!

देवळाच्या प्रांगणात कितीवेळ बसून राहायचं,शिवनामायला डोळ्यात सामावून घेत राहायचं,निसर्गावर प्रेम करत राहायचं.जोवर श्वास चालू आहे तोवर हे अनुभवणे कायम असेल कारण आयुष्याची बरीच कोडी इथे आलं की आपसूक सुटून जातात आणि मग वाटेला लागलो की पुन्हा एकदा आयुष्याकडे नव्याने सर्व ठीक होईल ही आशा घेऊन बघणं होतं. मग पुन्हा एकदा जगण्याला कारण भेटते...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...