गिरगांव भोंगे..!
#गिरगांवभोंगे...
मी ऐकलं होतं की एक काळ होत जेव्हा मुंबईत घड्याळी नव्हत्या,तेव्हा मुंबई घड्याळाच्या ठोक्यावर न चालता गिरगावचा वसाहतीमध्ये असलेल्या गिरण्यावर असलेल्या भोंग्यावर चालायची.गिरगावच्या अन् आसपासच्या परिसरातील सर्व गिरण्या हळू हळू बंद पडल्या अन् हा परिसर खुप भकास,भयानक भासू लागला.
बंद पडलेल्या गिरण्यांचा परिसर इतका भकास जाणवू लागला की,रातच्याला इकडे कुत्रेही भटकायला येईना झालं जे एखादं आलं ते रातभर इवळून पार मरायला यायचं.बंद पडलेल्या गिरण्या अन् त्याचे मोठमोठाले गोडावून तर काळाच्या आड आपलाही एक काळ होता याची हजेरी देत,भिंतींच्या पोपड्यासंगत स्वराज्याचा बुरुज ढासळला जावा तश्या या इतिहासाच्या खुणा मागे सोडत पडत राहिल्या...
पुढे याच गिरण्या अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या,कधीतरी कुणाचा रातोरात त्यांच्या गर्भात एखाद्या अर्भकाला मारून टाकावं तसं भोसकून मारून टाकलं गेलं अन् गिणती करता येणार नाही अशे कित्येक चेहरे ईथल्या चुप्या नशेच्या आहारी जावून आपल्याच हाताने पोटात खंजीर खुपसून काचेच्या तसबीरित जावून बसले.आता खरं काय,खोटं काय कित्येक गरिबांच्या कित्येक श्रीमंत लोकांनी इथे माना मुर्गळल्या...
कधी काय तर कधी काय,एक दिवस मग अशीच ती श्रीदेवी सुद्धा आपसूक आपल्यातून निघून गेली अन् त्या दिवशी म्हणे अख्या मुंबईत एकच गाणं ऐकू येत होतं, "कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली"...
पण हे ही त्या चाकरमाण्याना मान्य नव्हते,कारण त्यांना हे सर्व सवयीचे झाले होते जेव्हा गिरगाव अन् आसपास असलेल्या गिरण्या अश्या एकाकी बंद पडू लागल्या होत्या....
गिरण्या बंद झाल्या,भोंगे बंद झाले,पण मुंबई चालू राहिली,घड्याळ तिचं काम करत राहिली अन् काटे फिरत राहिले या काट्यांनी मात्र लोकांना हेरले अन् आता याच काट्यांसोबत मुंबईची पब्लिक सुध्दा चालू लागली...
सगळं मागे पडलं मुंबईची ती पब्लिक,सुतगिरणी,गिरगाव,भोंगे पण घड्याळ मात्र वेळेला जागुन चालत आहे,चालत राहिल...
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा