ईमेल आणि बरच काही..!
काळाच्या ओघात जश्या काही गोष्टी बदलत,गेल्या काही काळाच्या पडद्याआड गेल्या तसेच...पण विचार केला तर जरासे वेगळं काही अलीकडे आयुष्याच्या या वळणावर घडत आहे. अन् ते साहजिक आहे वयापरत्वे ते घडणार असतेच,फक्त हे कुणाला आपसुकच कळते,तर कुणाला याचा थांगपत्ताही लागत नाही किंवा कुणाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींची कधी तजवीज भासतच नाही...
हो नाहीच भासत कारण त्यांचं जीवन आधिकच तितकं सोयीचं असतं की,नाही वाटत कुठलीही कमतरता त्यांना की कुठलीही उणीव आपल्या आयुष्यात....
हो अलिकडे गेले काही महिने वर्षानुवर्ष कधीही न उघडणारा माझा E-Mail आयडी अलिकडे रोजच मी उगडून बघत असतो.एक दोन वेळा नाही तर दिवसातून जेव्हा सवड मिळत असेल तेव्हा मी तो उघडुन बघत असतो. अलिकडे एक एकवेळ फेसबुक वरती येणं होत नाही,Update राहायला जमत नाही,तितकं तिथे मात्र मी न चुकता रोजची आलेली मेल्स चेक करत असतो एक नाही दोन नाही रोजची कित्येक मेल्स असतात....
कधीतरी कुठल्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत,मग मी जॉब शोधत आहे म्हणुन आलेला मेल असेल तर कधी कॉलेजमध्ये काही काम निघाले तर त्याचा मेल असेल,कधी कुणालातरी एखाद दोन महिन्यापूर्वी नोकरीसाठी मेल्सद्वारे पाठवलेला माझा Resume,शैक्षणिक कागदपत्रं असेल अन् काल परवा तब्बल दोन महिने वाट पाहून आपले सेलेक्शन नाही झालं याचा E-mail आलेला असेल...दुसऱ्याच घटकेला कुठल्याशा नोकरीसाठी पाठवलेला मेल्स अन् माझं जॉबसाठी शोर्टलिस्ट होणं असेल, कुण्या तिसऱ्या ठिकाणी जागा निघाल्या आहे म्हणून कुण्या साहेबांन आठवणीने मला मेल केलेला असेल....
आपण नेहमीच म्हणतो की कुणालाही E-mail केला की त्या समोरच्या व्यक्तीला पुन्हा फोन करून सांगावे लागते की तुम्हाला मेल केलेला आहे चेक करून तुमची प्रतिक्रिया कळवा...
कारण आपल्याला माहीत असते E-mail कोण तरी वेळेवर बघतो,एखाद दुसरा दिवस उजाडला की मग तो कालपर्वाचा शिळा झालेला मेल बघितला जातो.
अलिकडे या बाबतीत मी अपवाद ठरतो आहे,घटकेघटकेला मी मेल्स चेक करत राहत असतो.प्रत्येक मेल सोबत नव्याने अनेक आशा,आकांशा असतात म्हणुन हल्ली मेल्सची वाट बघायला आवडते....
गेल्या काही महिन्यात अवघ्या जगात कुठेकुठे मेल्स पाठवले असतील अन् कुठून कुठून मेल्स आले असतील याला अंदाज नाही पण छान आहे ही मेल्सची दुनिया.कित्येक वेळा आनंदाचे काही क्षण देऊन जाते,कधीतरी दुःख तर,कधी फक्त आशेच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते....
अलिकडे Trashbox सहज भरून जातो,दिवसातून एखाद दोनवेळा तो रिकामा करावा अगदी अन् कधीतरी काही मेल्स Outbox मध्ये कायमचे पडून राहतात Important असे काही मेल्स येतात पण ते हुलकावणी देऊन जातात....
बघुयात मेल्सच्या या काळात किती दिवस अजुन प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघायची आहे,सध्यातरी मला मेल्सची दुनिया जवळची वाटते इतर सर्व माध्यमांपेक्षा...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा