#रुजलीजातजीमाझ्याआतआहे..!
#रुजलीजातजीमाझ्याआतआहे..!
रुजली जात जी माझ्या आत आहे,
ती जात नाही तीच ती कविता आहे...!!धृ !!
तू बोलायचे ठरवले जरी,
तरी मी मात्र अबोला माझा पाळणार आहे,
अन्
तू का शोधते कारण बोलायचे मी बोलायचे तूर्ताचतरी नाकारले आहे!!१!!
मी गेल्या वेळी वेळेशी बोललो,
थांब तू माझ्यासाठी आता काळही थांबला आहे,
अन्
बाकी वेळ,काळ यांचा मेळ अजूनही तुझ्या माझ्यासारखाच जुळता जुळत आहे!!२!!
बाकी कविता केल्या असशील तू कैक,
मी तुझ्या कवितांना भुलणारा गंधार नाही,
अन्
तू सावर स्वतःला अन् मीच झालो कविता होण्यासाठी तुझ्या पैक!!३!!
तू कवितेतून हृदयाशी संगम जो माझ्या केला,
आता सावर तुझी तू आणि सावर तुझी कविता,
अन्
जुळावे यमक इतकेही न सोप्पे माझ्याशी खेळण्या कवितेतूनी तू जो करार केला!!४!!
बाकी तुझ्यामुळे स्वल्पविरामाची ओळख कवितेतून झाली,
तू माझ्यावरती,माझ्या भुलण्यावरती कविता करत राहिलीस,
अन्,
माझ्या आयुष्याच्या या आगळ्यावेगळ्या कवितेत मी मात्र तुजसम पूर्णविराम शोधत राहिलो!!५!!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा