नेहमीप्रमाणे आज शेताच्या गावाला काही कामानिमित्त भेट द्यायला गेलो होतो,माझे काम आवरून मी शेतातून परतीच्या वाटेला निघालो होतो.....
पण नेमका त्या वस्तीपाशी येऊन मनात विचार आला की आज त्या वस्तीला भेट द्यायचीच,मग काय गाडी खाली लाऊन उंच टेकडीवर असलेल्या त्या वस्तीकडे पाऊले चालायला लागली. फारतर तीस चाळीस झोपडीवजा असलेली घरे,दोनशेच्या आसपास संख्या असलेली ही वस्ती.तशी ही वस्ती लहानपणा पासूनच ओळखीची होती,कारण शेताच्या वाटेला ती लागायची.....
इथे प्रामुख्याने भिल्लं,ठाकर,गोपाळ लोक असतात,ते त्यांचे पारंपरिक व्यवसाय करतात. सध्या ऊसतोड चालू असल्यामुळे वस्तीवर माझा खेरीच फक्त पन्नास साठ माणसे,लहान लहान मुलं असतील. त्यातली जे काही होती ती सकाळ सकाळी कामाला जायच्या गरबडीत होती, मग मी काही त्यांना बोलू शकलो नाही....
पण मग ठरवलं की आज येथील प्राथमिक शाळेला भेट द्यायची,शाळेत गेलो तर अजबच काही मुले तिथे खेळत बसली होती. अजून त्यांचा मॅडम पण आल्या नव्हत्या,साहजिक आहे ते मुलं इथच राहत असल्यामुळे ही शाळाच त्यांचे घर झाल्या सारखी असावी....
कुणी सिसो,कुणी झोका,कुणी घसरगुंडी खेळत होते,अंगणवाडी मध्ये असणारे मुलं शाळेच्या ओट्यावर लोळत होती. कुणी दप्तराचे बंद खात होती कुणी हापश्या वर चढून बसले होते....
अश्यात मी शाळेची एक दोन फोटो घेतले अन् आजू बाजूचा परिसर बघत बसलो. त्यातल्या काही मुलांना विचारले मॅडम कधी येतील रे ? तर ते मुलं बोले यतील थोड्या वख्तानं. मी मॅडम ची वाट पाहत बसलो होतो.....
त्या अंगवडीच्या पिल्लांना बघत होतो,तितक्यात शाळेतील मदतनीस बाई आल्या. ज्या खुप दूरवरून प्यायच्या पाण्याचा हंडा घेऊन आल्या, मला मनातच कसेतरी वाटले. एकीकडे शहरातल्या सरकारी शाळा अन् एकीकडे ही एकांतात असलेली ही शाळा.....
परंतु मला मनापासून भारत सरकारा बद्दल मनात अभिमान वाटत होता,इतक्या निर्जन अन् दूरवर असलेल्या भागात प्राथमिक शाळा उघडलेली होती, हे महत्त्वाचे अन् वाखण्या जोगे होते....
मला या वस्तीवरल्या,तांड्या वरल्या,केव्हा पालघर,वसई,विरार या आदिवासी भागातील त्या पाड्या वरल्या शाळेचे खुप आकर्षण आहे शहरी शाळा पेक्षा....
मी बघत होतो त्या मदतनीस बाईंनी आल्या आल्या अंगणवाडीच्या मुलांना लाडू पोषण आहार दिला,नंतर काहीतरी शिजवायला ही टाकले त्या मुलांसाठी....
मग पुढे काही वेळानी प्राथमिक केंद्र अन् अंगणवाडी केंद्राच्या प्रमुख सेविका ताई या मीटिंग करून येतच होत्या, त्या दूरवरून येतच असताना तेथील मुलांनी ताईंना तुम्हाला भेटण्यासाठी कुणीतरी आलेय हे सांगितले,क्षणातच मी अवाक झालो(कारण मी कुणी अधिकारी नव्हतो एक सामान्य मुलगा होतो)....
ताई आल्या तसे ताईंनी माझे आनंदाने स्वागत केले,मला ऑफिस मध्ये भेटण्यासाठी आत बोलावले. मी गेलो मग विचारपूस झाली विद्यार्थांच्या प्रतिसादाबद्दल विचारले,सरकार अशा शाळांसाठी चालवणार्या योजना बद्दल विचारले....
एकुण सर्व समाधान कारक होत,पण ताईंनी एक खंत बोलून दाखवली. की पालक लोक मुलांना नियमित शाळेत पाठवत नाही,त्यांना खुप वेळा यासाठी प्रवृत्त करुनही ते फारसे मनावर घेत नाही. परंतु ताईंची मेहनत अन समोरील परिस्थिती बघता एकुण व्यवस्थित शाळा चालू होती.अंगणवाडी अन् पहिली ते तिसरी वर्गातील पटावर जवळपास ७५ मुलं या शाळेत शिकत होते, हे खुप अभिमानास्पद होते.....
वेळे अभावी मला आता निघायचे होते पण निघत असतांनी ताईंनी माझ्याकडुन एक इच्छा व्यक्त केली, की मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात या शाळेबद्दल लिखाण करावे....
त्या साठीचा हा एक छोटासा प्रयत्न एकुण आजचा दिवस माझा साठी खास होता,अन् मग मी ताईंचा निरोप घेऊन निघालो.....
शाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी, एकलव्य नगर,अंधानेर.
तालुका:कन्नड,जिल्हा: औरंगाबाद.
#एक_भेट_त्या_ओळखीच्या_माझ्या_शाळेला....
लेखन:भारत लक्ष्मन सोनवणे.(कन्नड, औरंगाबाद).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा