सुरुवात करण्या आधीच काय लिहु ? व कोणत्या विषयवार लिहु ? याबद्दल काही सुचत नसल्यामुळे दोन-तीन शब्द टाइप करून पुन्हा डिलीट करतोय,पुन्हा लिहितोय,पण आज लिहायचे आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीतरी म्हणुन हा प्रयत्न...
माझ्यासाठी २०१९ हे वर्ष शैक्षणिक,समाजिक,आर्थिक,नोकरी,लेखन,इत्यादींसाठी कसे होते ?
हा प्रश्न पडला त्याला उत्तर म्हणुन हा एक प्रयत्न...
हे वर्ष खरतर प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरले.जग झपाट्याने कसे बदलत आहे,माणसे कसे बदलत आहे,कोण चांगले कोण वाईट हे ओळखण्यासाठीचे काही प्रमाणात यावर्षी मला अनुभव आले....
प्रत्येक गोष्टींसाठी वाढलेली स्पर्धा,मेहनत घेण्याची आपल्यात असलेली कुवत व सर्वात महत्त्वाचे आपल्यातील अंतर्गत कौशल्य,राहणे,बोलणे,इतरांसमोर आपण स्वताला नकली मुखवटा न घालता कसे present करायचे हे ज्ञान यावर्षी भेटले.मग ते शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,कुठल्याही क्षेत्रातून असो....
शिक्षण:माझ्यासाठी शैक्षणिक बाबतीत सांगायचे झाले तर हे वर्ष माझ्यासाठी सर्वात यशस्वी वर्ष आता पर्यंतचे होते. CET देऊन मी MBA सारख्या शिक्षणासाठी मी प्रवेश मिळवला,जे की माझं स्वप्न होते.शैक्षणिक क्षेत्रात पुढेही खूप मार्ग,अडचणी,अभाव असेल तेव्हा हे सातत्य कायम टिकवण्याचे प्रयत्न माझा असेल....
समाज:सामाजिकदृष्ट्या बघायचं झाले तर हे वर्ष माझ्यासाठी कुठेतरी मला कसोटींचे गेले. कारण समाजात अंधश्रद्धा,लोकांची मतमतांतरे, जात,धर्म,लिंग याविषयी असलेले विचार जरा नेहमीपेक्षा स्पष्ट समजायला लागले होते.नाहीतर मी त्यापुरक आता झालो होतो म्हणून मला ते प्रत्येक वेळी खटकत होते.परंतु समाजात काही चांगले लोक आहे याची प्रचितीही यावर्षी पेक्षा आदी कधी अनुभवायला भेटली नाही. कारण सांगली,सातारा,कोल्हापूर,नाशिक,पुणे,मुंबई,यांसरख्या शहरात आलेला महापुर व त्यासाठी लोकांनी दाखवलेलं माणुसकीचं,आपल्या माणसांना जपण्याचं खरेखुरे देवपण यावर्षी अनुभवले.मी सुध्दा या मदतीच्या कार्यात माझा छोटेखानी हातभार लावला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.....
आर्थिक:आर्थिक बाबतीत हे वर्ष माझ्यासाठी खुप काही नवीन संकल्पना घेऊन आले.आर्थिक बाबतीत मी पूर्णपणे मागास जरी असलो,परंतु त्याचे नियोजन ती व्यवस्था हाताळण्याचे गणितं यावर्षी काही प्रमाणात अनुभवायला भेटली.आर्थिक विश्वातही अनोख्या घडामोडी यावर्षाने जगाला दिल्या,एकूण हे वर्ष आर्थिक बाबतीत खुप महत्त्वाचे वाटले.
नौकरी व व्यवसाय:यावर्षी माझ्यासाठी आयुष्यातील नौकरीसाठी हे माझे सर्वात वाईट वर्ष असलेले वर्ष ठरले आहे. खूप वाईट अनुभव मला येत गेले,काही कारणास्तव ते मी स्वीकारही केले.आयुष्यातील दुसरा जॉब जो मी तब्बल सहा वर्षापासून करत होतो तो मी या वर्षी सोडला, त्याला अनेक कारण होते मग शैक्षणिक असो, फील्डमध्ये झालेले बदल असो.परंतु नवीन वर्षात पुन्हा तितकीच मेहनत करून एका नवीन नौकरीला मिळवायचे आहे,जी पुरेपूर माझ्या शिक्षणाशी जोडलेली असेल.व्यवसायबद्दल बोलायचे तर आमची परंपरागत चालत आलेली शेती पाऊस,उन,वारा,संकटे,रोगराई यांमुळे काही प्रमाणात नुकसानीची राहीली.उत्पन्न ही बऱ्यापैकी असेल याची खात्री राहील,पण यावर्षी अवकाळी पाऊस,मक्कावर आलेली लष्करी अळी यामुळे खुप मोठे नुकसान शेतकऱ्याचे झाले.पण शेती ही तिच्या लेकराला कधी उपाशी ठेवत नाही काहीतरी देतच असते.फक्त मेहनत असावी लागते तर हे वर्ष शेतीसाठी सुध्दा चांगले राहीलं....
लेखन,वाचन:हे वर्ष लेखन करण्यासाठी जो माझा छोटेखानी एक छंद आहे,तो जोपासण्यासाठी खुप छान राहिले.यावेळी अनेक कविता,पटकथा,हे प्रकार तोडक-मोडके लिहण्याचा माझा प्रयत्न राहिला. दोन संमेलनालाही मी हजेरी लावली आता हतनूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तिफन संमेलनाला ही जायचे ठरले आहे.असे अनेक प्रयत्न कामातून वेळ काढून छंद जोपासण्यासाठी करत आहे....वाचन म्हणाल तर यावर्षी मी बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे.श्यामची आई,शेतकऱ्याचा आसूड,नवा करार,श्री चित्कल मुक्ताबाई चरित्र्य हे पुस्तक मी वाचले,अजूनही वाचनाची भूक वाढवावी यासाठी प्रयत्न करत राहणार आहे.साहीत्य क्षेत्रात उपलब्धतेनुसार बरेच वाचन यावर्षी करू शकलो....
तर असे होते माझे २०१९ हे वर्ष....नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....
#बाय_बाय_२०१९...
#वेलकम_२०२०....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा