खरं सांगु का ?
म्हणजे कसे होते माहीतीये का तु काही तरी शब्द द्यावा,व तो पाळण्यासाठी मग मी दिवसाचा रात्र करावा किंवा जे अशक्य आहे ते सुद्धा करून बघावे.म्हणजे इतके कसे मन गुंतत असेल काही क्षणांच्या भेटीत......
मला कधी समजले नाही,म्हणजे तु अशी काय जादू करतेस या पेक्षा असे म्हणेल की,माझ्या मनावर काय भुरळ घालते की तुझा विचार हा एक क्षण ही सोडावासा वाटत नाही.प्रत्येकदा तेच तुझे स्थुतीसुमने उधळण्याचा काम.....
मला इतर कामे नसता का ? मी बांधील झालो असतो तुझा विचारान मध्ये हे आकर्षण आहे की प्रेम हे सुद्धा मला साधे समजत नाही.फक्त तुझा सौंदर्यावर फीदा होऊन,फक्त तुझा शब्द झेलावा मान्य आहे तुलाही नसते कुठली अपेक्षा माझ्याकडून पण तरीही हे गुंतणे का ?
बस् मग काय अजुन तुझं ते निखळ सौदर्य,प्रेम कित्येकदा अनुभवायचे असते,त्यात जे भेटतं त्याच्या पुढे सर्व काही अपुरे आहे....
#असेच_कधीतरी_काहीतरी_सुचलेलं.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा