जेवण झाले अन् मी खुप दिवसांनी माझा अडगळीतल्या खोलीत फेरफटका मारायला गेलो. साधारण तीन चार महिने झाले असेल मला त्या खोलीत जाऊन,गेलो कावडाची कडी खोलली. अन् आत गेलो खोलीत सर्विकडे जाळे अन् धुळ होती मग एका झाडूने सर्व झाडून काढले. आतापर्यंत नाकातून शिंका यायला सर्वात झाली होती, का तर मला दुळीची एलर्जी आहे. मग काय सर्व आवरून येऊन बसलो खुर्चीवर अन् न्याहाळत बसलो खोलीला तिचामध्ये खुप सर्व जुने ग्रंथ,पुस्तकं, वह्या, डायरी ठेवलेल्या होत्या. ज्या खुप जुन्या होत्या आमचा घराण्यात वाचनलेखन करायला माझा आजोबांना खूप आवडायचे. त्यांचा नंतर कदाचित मीच या खोलीत आलो असल, बाबांचं ते पुस्तकी ज्ञान पाहायला.कारण या खोलीकडे बाबा वारल्या नंतर कुणी फिरकलेच नाही मी प्रत्येक पुस्तक बघत होतो खुश होत होतो.आता बाबांचा प्रती मनात अजून एक नवीन आदरच स्थान निर्माण झालं होतं,एक वहीत बाबांनी लिखाण केलेलं ही सापडले अन् मी खुश झालो. कारण बाबांचा हा वारसा मी आता जपवत होतो काही वेळानं मी पण लिखाण करायला बसलो. थोडेफार लिखाण केले अन् पुन्हा बसून राहिलो मग YouTube वर search करत बसलो. अन् एकदम हिस्ट्री मध्ये मालगुडी डेज चे काही भाग दिसले त्यातला सर्वात आवडता माझा भाग एक गरीब आदमी मी बघत बसलो. जो मी आदी खुप वेळा बगितला आहे मला खूप आवडतो तो भाग दोन वेळा बगून झाले अन् मग झोप यायला लागली. मग काय त्या खोलीतच आजोबांचे जुने गोधडी चादर पडलेले होते ते घेतले अन् झोपलो, खरच आनंद वाटत होता आज कारण हल्ली वाचन फारसं कुणी करतच नाही. परंतु हे संस्कार मला लहानपणीच माझा आजोबाकडन भेटत गेले जेव्हा मला यातले फारसे काही समजत ही नव्हते. तर अशी ही माझी अडगळीतली खोली जिथं खुप आठवणी आहेत जिवंतरूपानं....
#एकखोलीअडगळीतली....
लिखित: भरत सोनवणे (सौमित्र).
गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा