लहानपण खरच किती निरागस असते नाही का ?
म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसायचे....
लहानपणी अनेक गोष्टींचे आकर्षण असते ते पुढे आयुष्यभर कायम सोबत असते असे मला तरी वाटते. मग ते चांगले कपडे,चांगले बुट,चप्पल,कटिंग,केव्हा आई कुठे बाहेर गेली की उंच ठिकाणी ठेवलेला साखर,शेंगदाण्याचा डब्बा काढणे असो हे आपल्याला खुप आवडायचे....
लहानपणी मला किचन मधले जवळ जवळ सर्व डब्बे कुठे असता हे पाट होते.हा साखरेचा,तो पत्तीचा,मसाल्याचा,चटणीचा,शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा,लाडूचा,चिवड्याचा,सर्व...
आता मात्र या उलट आहे जसा मोठा होत गेलो तसे किचनमध्ये जाणे कमी झाले.काळाच्या ओघात आता आईच म्हणते अरे खाऊन घे,भूक लागली नाही का ? अन् ते डब्बेही आता मला कुठे ठेवले आहे सापडेनासे झाले आहे....
लहानपणी माझा दिनक्रम एकूण असा असायचा मोठा दादा व एक छोटी दीदी आहे मला.मग लहानपणी दादा शाळेत जायचा तेव्हा त्याचे अनुकरण मी करायचो....
मग मलापण त्याच्या सारखे दप्तर,पुस्तक,पाटी होती,डब्बा होता मग दादा शाळेत गेला की माझी शाळा आमच्या ओट्यावर असलेल्या गेलरीत भरायची.आई काम आवरून दिदीला सांभाळत असायची,मी आपले काडूमाडू काही तरी लिहायचं,मोठ्यानं दहा पर्यंत येणारी उजळणी म्हणत राहायचं....
मग आई मला घरा पासून दूर असलेल्या किराणा दुकानात एक पेटी (माचिस) आणायला एक रुपया द्यायची.एक पेटी व मला ८ संत्र्याच्या गोळ्या त्यात यायच्या,मग काय आपली मज्जा असायची. हे काम मला खूप आवडायचे लक्षात राहावे,म्हणुन मी रस्त्याने मोठ्याने घोकत चालायचं....
मला लहानपणी बुटांचे खूप आकर्षण होते,मग कपडे थोडे जुने जरी असले तरी मला चालायचं. माझ्याकडे नेहमी दोन जोड तरी शिल्लक असायचे,कुठेही फिरायला गेलो की मला फक्त बुट घ्यायला आवडायचे.अजूनही हे वेड तितकेच आहे किंचितही यात बदल झालेला नाही....
कटिंग हा माझा आयुष्यातला एक अनोखा आवडता प्रकार तेव्हा होता,आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी कटिंग करायचो.म्हणजे कटिंगवाले ते बाबाच आमच्या घरी यायचे ओळखीचे होते ते फार,त्यांना ऐकायला कमी यायचे पण कटिंग भारी करून द्यायचे.....
एक पिशवी त्यात कैची,कंगवा,साबण,फुटका आरसा,असे त्यांचे साहित्य असायचे,धोतर घातलेले ते बाबा डोक्यात टोपी अन् बारीक शरीरयष्टी असलेले होते. आजही ते कटिंग करतात अन् मलापण ओळखतात,अजूनही भेटले की आवर्जून त्यांची विचारपूस होते....
नंतर मग थोडे मोठे झाल्यावर आम्ही तिघे भाऊ बहीण मम्मी बरोबर नाक्यावर असलेल्या त्या सलून मध्ये जायचो.ते सलून अन् तिथले काका अजूनही ओळखीचे आहे,मला कटिंग करायला खुप आवडायचे कटिंग करतानी ती मानेला होणारे गुद्गुद्द्दी अजुनही भारी वाटते....
कटिंग म्हणजे आमच्यासाठी सोहळा असायचा, ज्याची वाट मी नियमित बघत असायचो.एकूण असा होतो मी जरा वेगळा की इतरां सारखाच हे मात्र अजुन उमगले नाही....
#बालपण_आठवणीतले.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा