After long time Cricket..!
#Afterlongtime..!
आता सध्या मला असलेलं रिकामपण अन् लहानपणीची दोन्ही हातांवर मोजता येईल इतकी मित्र सध्या रोजच्या माझ्या आयुष्यात सोबती असल्यानं आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला जातोय.होय,तब्बल नऊ ते दहा वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटची बॅट हातात धरली आहे,गेले आठ-पंधरा दिवस वेळ भेटल तसं खेळत असतो....
आता पूर्वीसारखं खेळता येत नाही पण आयुष्याच्या या वळणावर जसं समजून घेणारी ही मित्र भेटली आहे अगदी तितकंच अन् तसच क्रिकेट मध्येही ती सांभाळून घेतात...
१३-१४ व्या वर्षी आमच्या टीमचा असलेलो मी युवराज आता खरंच नाही खेळत पहिल्यासारखं,पहिल्यासारखे सहज बाँड्रीपार सिक्स नाही जात माझ्याकडून किंवा नाही टीमच्या अडीअडचणीवेळी विकेट घेऊन टीमला संकटातून तेव्हाच बाहेर काढता येतं मला आता.आता एक छान आहे हेच मित्र समजदार झाल्यानं समजून घेतात हल्ली अश्यावेळी मला...
सुरुवातीच्या चार-पाच दिवस तर हातात धरलेली बॅट पहिल्यासारखी घुमवतासुद्धा येत नव्हती,की बाँड्रीत गेलेला बॉल बॉलरपर्यंत सुद्धा फेकता येत नव्हता,हात खांद्यापासून दुखायला लागायचा. फिल्डींग करतांना कित्येक हातातल्या कॅचेस सहज सुटून गेलेल्या पण नऊ-दहा वर्षांनी मी पुन्हा खेळतांना दिसतोय हेच त्यांना आनंद देणारं होतं,त्यामुळे सांभाळुन घेतलं त्यांनी अजून काय हवं असतं मित्रांकडून...
जेव्हा इतक्या वर्षांनी मी खेळतोय पण त्याच अन् तेव्हाचाच माझ्यावर असलेल्या विश्र्वासानं निर्णायक ओव्हरीतसुध्दा माझ्याकडे बाॅलींगसाठी बाॅल सोप्पवला जातोना तेव्हा माझ्या पहिल्या बाॅलवर सिक्स गेला तरी समजुन घेणारे अन् माझे बॉलींग करतांना अजुनही काही सरावाने तसेच बॉल पडतील हे सांगायला मित्र विसरले नाहीत..!
त्यामुळं हल्ली सर्वांना वेळ भेटल तेव्हा शहराच्या बाहेर कुणाला त्रास नको,लहानपणी फोडलेल्या घरांच्या काचा,अन् आपल्याच माणसांची खाल्लेली बोलणी नको म्हणून शहराच्या बाहेरील भागात मस्त ग्राऊंड करुन त्याच लहानपणीच्या वेडानं दगडांची बाँड्री करून आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला लागलो आहे...
आता फार कुणी काका,मावशी रागवत नाही कारण अलिकडे दिवसभर क्रिकेट खेळणं आम्हालाही झेपत नाही,सात-आठ मॅचेस झाल्यात की खूप होवून जाते पण त्यातही तितकाच आनंद मिळतो जितका पूर्वी मिळायचा...
आता सात-आठ दिवसांच्या सरावानंतर बऱ्यापैकी क्रिकेट खेळायला जमायला लागलं आहे.पुन्हा एकदा आमचा युवराज फॉर्ममध्ये आला म्हणून मित्र बोलत असतात हल्ली मला.फार नाही पण प्रत्येक एखाद्या मॅचमध्ये एखादा सिक्स,फोर मारतोय हल्ली बऱ्यापैकी सिंगल,डबल रन काढत असतो आता...
अन् हो तशीच बॉलिंगसुद्धा करायला लागलो आहे,बोटांवर बॉलची स्विंग करायला पुन्हा एकदा जमायला लागलं आहे,मग ती लेग असो किंवा ऑफ.एखादी विकेट भेटून जाते अन् तितकच मानसिक समाधान भेटून जातं...
माझ्या बॉलिंगला फार सिक्स नाही जात आता पण माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी लहान असलेली मित्र छान क्रिकेट खेळतात आता,प्रत्येकात विराट,रोहित,गंभीर बघावा असे खेळता,त्यामुळं त्यांच्यासमोर आमचा निभाव लागत नाही अलिकडे...
आमच्या बाबतीत क्रिकेट खेळासाठी असलेली व्याख्या बदलली आहे,आता आम्ही स्पर्धा म्हणून कधीच क्रिकेट खेळत नाही.आता फक्त त्यातून आनंद भेटतो अन् जुने मित्र पुन्हा एकदा भेटतात पुन्हा कुणीतरी युवराज भाई या बोलला सिक्स मार..! असे म्हणणारे भेटतात,त्यामुळं आनंद वाटतो खेळायला पुन्हा इतक्या वर्षांनी...!
बाकी युवराजसारखी फिल्डींग पुन्हा जमायला लागली आहे,हातात असलेली कॅच असो किंवा दूरपर्यंत पळत जावून धरायला लावणारी कॅच आता हातातून सहज सुटत नाही अन् मिसफिल्डींगसुद्धा कधी होत नाही...
बाकी शिकतोय अजून आयुष्यातसुद्धा अन् कित्येक वर्षांनी क्रिकेट खेळतो आहे यातसुद्धा..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा