एकांताला सोबत घेऊन मनाशीच जेव्हा मनाचा संवाद चालू असतोना,तेव्हा आपण अनेक इच्छा, विचार मनाशी व्यक्त करून मोकळे होऊन जातो...
काही दिवसांपूर्वी असेच एकदा विलुप्त झालेल्या त्या आठवणीं बद्दल मनात विचार येऊन
गेला...
कसे असते नाही...ती वेळ,तिचं त्याच्यावर अवलंबुन असणे,त्याचा तिच्यावर असलेला विश्वास पण अलीकडे या नात्याला मी व्यवहारीपणाची जोड दिली अन् सर्व कसे बदल्यासारखे वाटू लागले आहे....
कसे असते नाही का,आपण कधीच विचाराने परिपूर्ण नसतो मग ते प्रेमाच्या बाबतीतही तसेच असेल...हा विचार अलीकडे मला प्रत्येक गोष्टीला व्यवहारी पारड्यात मोजून बघण्याची सवय लावतोय अन् तीच सवय मलाही झाली
आहे...
यात मग सगळेच आलं प्रेम,पैसा,नाते,मित्र हे सर्वच कारण जेव्हा जेव्हा आयुष्य जगतांनी वाईट अनुभव येत गेले...
त्यावेळी कुठेतरी कारण फक्त आपलं व्यवहारी नसणे हे होते...
जगण्याच्या या चौकटीत उंबरा पार करतांना व्यवहारी राहणे अलीकडे काळाची गरज झालीये...व्यवहारीक असलं की जगणं सुखी होते की नाही हे माहीत नाही,मात्र एक Safe Life अनुभवण मिळतं अश्यावेळी....
#Professional_Life_तिच्याशी_जोडलेलं_जीवन....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा