भटक्या लोकांची कुठे अवस्था मांडू येथे मी,
जिथं माझीच सोय नाही,माझ्याच प्रश्नांना येथे माझीच उत्तरे नाही...!
दारिद्र्य रेषेच्या सखोल चाचणीत आम्ही पास झालो आहे,बाकी सगळीकडे मात्र बळजबरीच नापास केलो आहे...!
पसाभर धान्यासाठी चारदा खेट्या आमच्या राशनच्या दुकानाला आहे,तिथेही जातीनिहाय कलरच्या राशनकार्डचा आमच्यावर अन्याय आहे...!
खळगीभर पोटासाठीचा प्रवास आमचा रोजचाच जगण्यासाठी होत आहे,खांद्यावरचा पधरही मग भाकरी मागण्यासाठी झुक्तो आहे...!
अठराविश्र्व दारीद्र्यात जगणे आमचे,हुर हूर लागल्या जीवाला मरणे पसंत आहे,खर्या प्रश्नांना खोटी उत्तरे जीवनात आनंदात जगणे फक्त कल्पनेत आहे....
भाकरीची खोटी आश्या टिचभर पोटासाठी जिवंत ठेवत आहे,खोट्या आशेच्या निराशे पायी गळ्यात मंगळसूत्र फासाचेच आता शोभते आहे...!
भटक्या लोकांची कुठे अवस्था मांडू येथे मी,जिथं माझीच सोय नाही,माझ्याच प्रश्नांना येथे माझीच उत्तरे नाही...!
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा