तुमच्या भटकण्यावर दोन-तीन कविता झाल्या,तिच्या आठवणीत दोन तीन लेख झाले,या सर्वांच्या विचारात माझी रात्रही ढळून गेली...दिवसही उगवून सकाळची दुपार झाली आहे,काय साध्य झालं ?
याचं उत्तर नाहीचे...
फक्त इतकं आहे की,सद्या वेळ आहे ती कारणी
लागली आहे...
वेळेचे गणित जर इतके सोप्पे झाले असेल तर खरच माझं भविष्य अंधारात दिसतंय व ते काही दूर नाहीये,बस इतकंच बाकी विचार करायचा नाहीचे सध्या...
कारण विचारांना विचारांचे हात भेटले की त्यांना मोकळीक भेटत असते,मग ते या झळाया तुटणाऱ्या उन्हात आकाशात मुक्तपणे विहार करायला लागतात त्या काल्पनिक पंखांना शरीरास जोडते करून...
काय हवे ? काय करतोय ?
याला उत्तरे नाहीचे सध्या ती शोधायची पण नाहीये...
कारण कैफात मग,मन पुन्हा कल्पनेच्या जगात फिरून येतं मग मला भूतकाळ आठवतो...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा