"मंटो"...
मरणाच्या एक वर्ष आधी त्यांनी आपल्या कबरीवरच्या शिलालेखावर लिहायचा मजकूर लिहून ठेवला होता तो असा,
“यहाँ "सआदत हसन मंटो" को दफनाया गया है, जिनके हृदय में सभी रहस्यों और लघुकथा लेखन की कला प्रतिष्ठापित है। धरती के ढेर के नीचे दबे हुए,वह अब भी इस बात पर विचार कर रहे हैं कि क्या वह लघुकहानी के महत्तर लेखक या खुदा है !’’
सच है"मंटो"...
पर आज भीं यह जमाना नाकाबिले-बर्दाश्त है...
ओळख उर्दुशी झालेली-
अलीकडे उर्दू भाषेप्रती मनात जवळीक,प्रेम निर्माण होत आहे,सतत तिला ऐकत राहावं वाटते...म्हणजे उर्दू भाषेत व्यक्त होण्याची जी शाब्दिक लकब आहे ती अलवार संथ वाहणार्या वाऱ्याप्रमाणे आहे असे भासते....उर्दू भाषा प्रेम करायला शिकवते,या उर्दू भाषेतील रचनेत येणारी ती नजाकत तो रुतबा हे सर्व खूप अलवार,अप्रतिम आहे...हे सर्व समजायला थोडेसे अवघड परंतु रातराणीच्या सुगंधाप्रमाणे सुगंधित बहारदार फुललेलं वाटते ऐकतांना......
उर्दू भाषेत आजवर मी कुठलीही गझल ऐकली की,फक्त एकच मनात येते पुन्हा-पुन्हा ती ऐकत राहावी इतकंच वाटत असते...
आदरतिथ्य,शब्दांवर प्रेम करायला उर्दु शिकवते नेहमीच आपल्याला.तिच्या सानिध्यात ती फक्त सुकुन, शब्दांचा अलवारपणे व्यक्त होणं भेट देत असते नेहमीच आपल्याला...!
अलीकडे जेव्हा गझल,शेरोशायरी ऐकतो ती लकब ती उर्दुची ओळख होत नाही जी मंटो,गालिब,मीर तकी मीर यांच्या आवाजातून ज्या उर्दुची ओळख होत असे...
अलीकडे काहि दिवसांपूर्वी शम्स जालन्वी यांची गझल,शायरी ऐकली होती अगदी सुंदर...
नव्वदीचे शम्स जालन्वी साहेब जेव्हा गातात तो आवाज खरच तोड नाही त्याला....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा